शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा घरांच्या किमतीत कपात

By admin | Updated: May 29, 2014 03:25 IST

लोकसभेत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस आघाडी सरकारला ५ महिन्यांवर आलेल्या विधानसभेत होणारे पानिपत डोळ्यापुढे दिसू लागल्याने ‘डॅमेज कंट्रोल’साठी प्रयत्न सुरू केले आहेत.

जमीर काझी, मुंबई - लोकसभेत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस आघाडी सरकारला ५ महिन्यांवर आलेल्या विधानसभेत होणारे पानिपत डोळ्यापुढे दिसू लागल्याने ‘डॅमेज कंट्रोल’साठी प्रयत्न सुरू केले आहेत. म्हाडाच्या लॉटरीतील घरांच्या किमती कमी करण्यापासून त्याची सुरुवात केली. नागरिकांचा रोष लक्षात घेऊन तातडीने हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचना केल्यानंतर अधिकार्‍यांनी तत्परतेने बदल केल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबई व कोकण मंडळाच्या २६४१ घरांसाठी पूर्वी जाहीर केलेल्या दरामध्ये सरासरी १ ते ४ लाख कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा व्हावा, या हेतूने या वर्षी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हाडाच्या घराच्या लॉटरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र त्याबाबत आक्षेप आल्यानंतर आयोगाने त्याची प्रक्रिया निवडणूक निकालानंतर सुरू करण्याचे आदेश म्हाडाला दिले. लोकसभेत मुंबई, कोकणातील सर्व जागांवर धुव्वा उडण्याबरोबरच ४८ पैकी केवळ ६ जागा मिळाल्याने सरकारच्या कारभाराबाबतची नाराजी प्रकट झाली. त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बाजाराच्या बरोबरीने ठेवण्यात आल्याने लॉटरीला या वेळी थंडा प्रतिसाद मिळत होता. नागरिकांतील हा असंतोष विधानसभेवेळी आणखी उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागल्याने गृहनिर्माण विभाग स्वत:कडे असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांना बोलावून घेतले. कोणत्याही परिस्थितीमध्ये घरांचे दर कमी करावे, त्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची सूचना केली. त्यांनी मुंबई व कोकण मंडळांतील अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर म्हाडाच्या या गृहप्रकल्पावर झालेल्या खर्चातील ‘इंटरेस्ट कॅपिटन्स’चे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाल्यास उत्पन्न गटनिहाय सरासरी १ ते ४ लाखांपर्यंत किंमत कमी करता येणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ही टक्केवारी १४.५ वरून १०.५ पर्यंत खाली आणण्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये मांडून त्याला मंजुरी घेण्यात आली. मुंबई व कोकण मंडळांच्या अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटामधील घरांच्या किमतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर मंगळवारी वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादर करून त्याला मंजुरी मिळविली. त्यानंतर बुधवारी लॉटरीचे बदललेले दर व कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे अधिकार्‍याने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)