कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मृती जपण्यासाठी कोल्हापूर महापालिका त्यांचे स्मारक उभारणार आहे. तसेच महापालिकेच्या शाळांत त्यांची पुस्तके वाटून एका शाळेस त्यांचे नाव देण्यात येऊन वाचनालयही सुरू करण्यात येणार आहे.महापालिकेत बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय शोकसभेत उपमहापौर मोहन गोंजारे यांनी ही माहिती दिली. राज्य व केंद्र शासनाने या पुरोगामी नेत्याला आदरांजली वाहण्याची तसदीही घेतली नाही, अशी खंत सर्वपक्षीय नेत्यांनी येथे व्यक्त करीत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.कॉ़ पानसरे यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी केली होती. (प्र्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}