शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल सीईटीचा अखेरपर्यंत घोळ

By admin | Updated: June 7, 2015 02:42 IST

एनईईटी त्यानंतर सीईटी, पुन्हा अभ्यासक्रमातील बदल, ऐनवेळी घेतले जात असलेले निर्णय यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल

नांदेड : एनईईटी त्यानंतर सीईटी, पुन्हा अभ्यासक्रमातील बदल, ऐनवेळी घेतले जात असलेले निर्णय यामुळे वैतागलेल्या विद्यार्थ्यांना मेडिकल सीईटीच्या निकालातही कटू अनुभवाला सामोरे जावे लागले. जीवशास्त्रातील बरोबर असलेले उत्तर अखेरच्या क्षणी चूक ठरवत शेकडो विद्यार्थ्यांचे पैकीच्या पैकी गुण मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. संदिग्ध प्रश्नामुळे तीन गुणांचे सरसकट वाटप केल्यानंतर भौतिक शास्त्र व जीवशास्त्रातील प्रत्येकी एक प्रश्नाचे उत्तर अंतिमत: बदलण्यात आल्याने पावणेदोन लाख विद्यार्थ्यांच्या गुणांचा आलेख खालावला. विशेष म्हणजे, जीवशास्त्रातील बरोबर उत्तर चुकीचे ठरविल्याचा दावा विषयतज्ज्ञ प्रा. गणेश चौगुले यांनी संदर्भासह केला आहे. प्लाझ्मा सेल्स आर डिराईव्हड फ्रॉम या प्रश्नासाठी २० मे रोजी प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीनुसार मेमरी-बी सेल्स हे उत्तर देण्यात आले होते़ ५ जून रोजी या प्रश्नाच्या उत्तरात बदल करत आॅनलाइन घोषित केलेल्या निकालानुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर हेल्पर-टी सेल्स असल्याचे वैद्यकीय संचालनालयाने जाहीर केले़, परंतु उपरोक्त उत्तर चूक असून, पूर्वीच्या सूचीतील मेमरी-बी सेल्स हेच उत्तर बरोबर असल्याचे विद्यार्थी तसेच या विषयातील प्राध्यापकांचे म्हणणे आहे़ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुस्तकानुसार या प्रश्नाचे उत्तर अ‍ॅक्टिव्हेटेड-बी सेल्स असे असावयास हवे होते़ परंतु वैद्यकीय संचालनालयाने घेतलेल्या सीईटी परीक्षेत सदरील प्रश्नाच्या उत्तरातील चारही पर्यायात हे उत्तर देण्यात आलेले नाही़ हेल्पर-टी सेल्स या केवळ बी-लिम्फोसाइट सेल्सला स्टीमुलेट केल्यावर बी-लिम्फोसाइटचे रूपांतर अ‍ॅक्टिव्हेटेड बी-लिम्फोसाइटमध्ये होते़ त्यानंतर यापासून प्लाझ्मा सेल्सची निर्मिती होते़ परंतु प्रश्नात प्लाझ्मा सेल्स आर डिराईव्हड फ्रॉम अर्थात त्या कोणापासून निर्मित होतात, असे विचारले आहे़ निर्मितीला चालना देणे, स्टीमुलेट आणि निर्मिती करणे या दोन्ही बाबी विभिन्न आहेत़ जेव्हा पहिल्यांदा रोगाचा प्रादुर्भाव होतो़ त्यानंतर मेमरी-बी सेल्स तयार होतात़ याच मेमरी-बी सेल्स दुसऱ्यावेळी कार्यान्वित होतात तेव्हा यापासूनही प्लाझ्मा सेल्सची निर्मिती होते़ त्यापासून अँटीबॉडीज तयार होतात असे प्रतिक्षमताशास्त्राच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील पुस्तकात नमूद आहे, परंतु याचा उल्लेख महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या पुस्तकात कुठेही आढळून येत नसल्याचे प्रा. चौगुले यांनी स्पष्ट केले.