शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या दारातच प्रसूती, अर्भकाचा मृत्यू

By admin | Updated: September 6, 2016 03:54 IST

वेळेवर दाखल करून न घेतल्याने महापालिका रुग्णालयाच्या दारातच सोमवारी एका महिलेची प्रसूती झाली

अहमदनगर : वेळेवर दाखल करून न घेतल्याने महापालिका रुग्णालयाच्या दारातच सोमवारी एका महिलेची प्रसूती झाली, त्यात अर्भकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात सकाळी प्रसूतीसाठी आलेल्या प्रीती महेंद्र जोशी यांना डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यासाठी एका खासगी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जोशी यांना सोनोग्राफी करण्यासाठी नेले. मात्र तेथे गर्दीमुळे त्यांची वेळेवर तपासणी झाली नाही, त्यातच त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी त्यांना पुन्हा देशपांडे रुग्णालयात आणले. रुग्णालयात नेत असताना प्रवेशदारातच त्या प्रसूत झाल्या. त्यानंततर कर्मचारी आले, मात्र १५ मिनिटे डॉक्टर तिकडे फिरकलेच नाहीत. काही महिला कर्मचाऱ्यांनी जोशी यांना दाखल करून घेतले. मात्र जन्मलेले अर्भक मृत असल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच आ. संग्राम जगताप, नगरसेवक विपुल शेटिया, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रुग्णालयात आले. डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आ. जगताप यांनी केली. कॉल आॅन डॉक्टर सुविधा असताना महिलेची तपासणी का झाली नाही, असा सवाल जगताप यांनी केला. मात्र डॉक्टरांनी त्याबाबत मौन बाळगले. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)