विवाहीतेच्या विनयभंग जेलरक्षकाला प्रकरणी अटक
By Admin | Updated: June 2, 2014 22:47 IST2014-06-02T22:03:26+5:302014-06-02T22:47:25+5:30
घरामध्ये झोपलेल्या महिलेच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार येरवडा कारागृहाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये घडला.

विवाहीतेच्या विनयभंग जेलरक्षकाला प्रकरणी अटक
पुणे : घरामध्ये झोपलेल्या महिलेच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार येरवडा कारागृहाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी कारागृह रक्षकाला अटक केली आहे.
बालाजी श्रीराम मुंडे (वय ३०, रा. येरवडा जेल क्वार्टर्स, येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. मुंडे हा येरवडा कारागृहामध्ये जेलरक्षक आहे. तर पिडीत महिलेचे पतीही येरवडा कारागृहात नोकरीस आहेत. पिडीत महिला आणि मुंडे एकाच कॉलनीमध्ये राहण्यास आहेत. रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास पिडीत महिला घरामध्ये झोपलेली असताना त्यांच्या घराचे दार उघडे राहीलेले होते. मुंडे याने घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. पिडीत महिलेसोबत अश्लिल वर्तन करुन त्यांचा विनयभंग केला.