शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या चिंताजनक; हिंसा नको - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:30 IST

मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही. सध्याची परिस्थिती संवेदनशील आहे. आम्ही दखल घेतली आहे. त्यामुळे हिंसाचार व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन उच्च न्यायालयाने केले.मराठा आरक्षणाबाबत जलदगतीने निर्णय घेण्यासंदर्भात आर. आर. पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. न्यायालयाने मराठा समाजाला शांतता पाळण्याचे आवाहनही केले. ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही या स्थितीची दखल घेतली आहे. राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोग कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत. समाजाने हे लक्षात घ्यावे. यापुढे आंदोलनकर्ते कायदा हातात घेणार नाहीत, यावर आमचा विश्वास आहे. आंदोलनासंबंधी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त आम्ही वाचले आहे. काही आंदोलकांनी केलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. आयुष्य मौल्यवान आहे आणि ते अशा रीतीने नष्ट करू नका,’ असे न्यायालयाने म्हटले.पाच संस्थांना कामछत्रपती शिवाजी प्रबोधिनी संस्था (औरंगाबाद), रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी (मुंबई), शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (नागपूर), गुरुकृपा विकास संस्था (कल्याण) आणि गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स (पुणे) या पाच संस्थांमार्फत ३१ जुलैपर्यंत राज्यभरातून माहिती जमा झाली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या विविध विभागांकडूनही माहिती मिळाली आहे. सर्व प्रकारची माहिती, जुने न्यायनिवाडे, राज्यघटनेतील तरतुदी असा सर्व विचार करून आणि शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करू, असे आश्वासन आयोगाने दिले आहे, अशी माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर न्यायालयात सादर केली.>१५ नोव्हेंबरनंतर निर्णयमराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकार त्याविषयी निर्णय घेईल, अशी माहिती राज्य सरकारनेच मुंबई उच्च न्यायालयात आज दिली.>आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंतमराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही, याबाबतचा अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारला देऊ, असे आश्वासन न्या. एम. व्ही. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाने दिल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी न्यायालयात दिली. त्यावर मागासवर्ग आयोगाने लवकरात लवकर अहवाल देण्याचा प्रयत्न करावा आणि १० सप्टेंबर रोजी प्रगती अहवाल सादर सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.परळीतील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित केल्याची घोषणा मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर, पुणे येथे क्रांती दिनी आंदोलन होणार आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण