Maratha Kranti Morcha : मराठवाड्यात धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:18 AM2018-07-24T00:18:04+5:302018-07-24T00:18:07+5:30

गंगाखेडला बस जाळली; हिंगोली, लातुरात दगडफेक

 Maratha Kranti Morcha: Terror in Marathwada | Maratha Kranti Morcha : मराठवाड्यात धग कायम

Maratha Kranti Morcha : मराठवाड्यात धग कायम

googlenewsNext

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम आहे. सोमवारी काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. गंगाखेड येथे आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड करीत एक बस पेटवून दिली. हिंगोली, लातूर येथेही बसेसवर दगडफेक झाली.
परळीत ठिय्या आंदोलन सुरूच असून, नांदेड, जालना जिल्ह्यात रास्ता रोको झाला. परळीत आंदोलनस्थळी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सायंकाळी पाटोदा तालुक्यात शिवनेरी व बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. पाटोदा येथे आमदार भीमराव धोंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना आंदोलकांच्या भावना कळविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
परभणी जिल्ह्यात गंगाखेडला दहा गाड्या फोडण्यात आल्या. एक बस जाळली. आंदोलक हिंसक झाल्याने परभणीहून आलेल्या दंगल नियंत्रण पथकाने सौम्य लाठीमार करून जमाव पांगविला़ दोन पत्रकारांनाही मारहाण झाली़ त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ आमदार
डॉ़ मधुसूदन केंद्रे यांच्या कार्यालयावर दगडफेक झाली़ नांदेड, हिंगोली, लातूर, जालना जिल्ह्यातही
आंदोलन झाले.

Web Title:  Maratha Kranti Morcha: Terror in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.