शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र शोधण्यासाठी उपसला तलाव!

By admin | Updated: June 5, 2015 01:57 IST

पाण्यात पडलेले मंगळसूत्र शोधण्यासाठी पतीने चक्क संपूर्ण तलावच रिकामा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी कामापूर गावात घडला़

नरेंद्र जावरे ल्ल चिखलदरा (जि. अमरावती)पत्नीच्या प्रेमापोटी शहाजहानने ताजमहाल बांधला़ पत्नीवरील प्रेम दाखवणारी अशी अनेक उदाहरणे इतिहासात आढळून येतात़ पण पाण्यात पडलेले मंगळसूत्र शोधण्यासाठी पतीने चक्क संपूर्ण तलावच रिकामा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी कामापूर गावात घडला़ एवढे करूनही मंगळसूत्र काही सापडले नाही, पण तलाव मात्र रिकामा झाला आणि पतीवर फरार होण्याचा बाका प्रसंग ओढवला़चिखलदरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावरील कामापूर या गावात रामू शिकारी बेलसरे हा पत्नीसह राहतो़ गावात वनविभागानेनाल्यावर लहान तलाव बांधला आहे. या तलावात आदिवासीबांधव मासेमारी करतात़ हेच पाणी गावकरी पिण्यासाठीही वापरतात. रामू बेलसरे हा बुधवारी पत्नीसह तलावावर मासेमारीसाठी गेला. रामू मासेमारी करीत असताना त्याची पत्नी तलावाच्या कडेला कपडे धूत होती. दरम्यान, खाली वाकल्याने तिचे मंगळसूत्र तलावात पडले. ही बाब लक्षात येताच या दाम्पत्याने शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले़ पण, मंगळसूत्र काही सापडले नाही. अखेर रामूने परिसरातीलच एका शेतातील डिझेल इंजिन आणून तलावातील पाण्याचा उपसा सुरू केला़ ते पाणी नाल्यात सोडले़ शेतात ओलितासाठी पंप लावला असेल असे वाटल्याने त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. मात्र, संपूर्ण तलाव रिकामा झाल्यानंतर ही बाब उघड झाली आणि एकच खळबळ उडाली. रामू बेलसरेच्या प्रतापाची चर्चा वनाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. वनकर्मचाऱ्यांनी तलावाचा पंचनामा करून रामूची शोधमोहीम सुरू केली़ परिणामी, रामूवर फरार होण्याची वेळ आली़च्कामापूर वन व्यवस्थापन समितींतर्गत हा ‘चेक डॅम’ तयार करण्यात आला. त्याची देखरेख समिती करते. उन्हाळ्यात पाण्याची सर्वाधिक गरज असताना रामू बेलसरे याने केलेले कृत्य गंभीर आहे. त्यामुळे समिती व वन कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. घटनेचा पंचनामा केला.या विचित्र प्रकाराचा वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. हा तलाव पुन्हा भरण्यात आला आहे. उन्हाळ्यात गावकरी व वन्य प्राण्यांसाठी हा तलाव बहुउपयोगी ठरतो. - एस. युवराज, उपवनसंरक्षक, पूर्व मेळघाट वन विभाग, चिखलदरापावसाळ्यात टेकडीवरील वाहते पाणी याच तलावात साचते. डिझेल पंपाद्वारे रिकामा केलेला हाच तो ‘चेक डॅम’.