शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मुकुटात मानाचा तुरा

By admin | Updated: November 19, 2014 00:53 IST

वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती झाल्यामुळे नागपूरच्या मुकुटात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर हे पद नागपूरच्या वाट्याला आले आहे.

सुनील मनोहर महाधिवक्तापदी : २१ वर्षांनंतर पद नागपूरच्या वाट्याला नागपूर : वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती झाल्यामुळे नागपूरच्या मुकुटात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर हे पद नागपूरच्या वाट्याला आले आहे. ते नागपूरचे तिसरे महाधिवक्ता होय. यापूर्वी दिवंगत वरिष्ठ वकील अरविंद बोबडे यांची १९८० व १९८५, तर वरिष्ठ वकील व्ही. आर. मनोहर यांची १९९३ मध्ये महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली होती. बोबडे यांनी हे पद दोनवेळा भूषविले आहे. याशिवाय सुनील मनोहर यांच्यामुळे राज्याच्या इतिहासात एकाच कुटुंबातील दोघांना महाधिवक्ता होण्याचा मान प्रथमच मिळाला आहे.यावेळी सुनील मनोहर यांच्यासह नागपूरचेच वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, छत्तीसगडचे महाधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा, मुंबई येथील वरिष्ठ वकील राम आपटे व औरंगाबाद येथील वरिष्ठ वकील विनायक दीक्षित यांची नावे महाधिवक्तापदासाठी चर्चेत होती. मनोहर यांचे नाव मात्र आघाडीवर होते. आज, मंगळवारी त्यांच्या नावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. यानंतर विधी विभागाच्या सचिवांनी मनोहर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून खुशखबरी जाहीर केली. यापूर्वी डेरिअस खंबाटा महाधिवक्ता होते.व्ही. आर. मनोहर यांचे मार्गदर्शनमाजी महाधिवक्ता अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर यांचे सतत मार्गदर्शन मिळत असते. या बाबतीत मी सुदैवी आहे, असे सुनील मनोहर म्हणाले. महाधिवक्ता म्हणून कार्य करताना व्ही. आर. मनोहर यांच्यासह मिळेल तेथून मार्गदर्शन घेत राहील, असेही त्यांनी सांगितले.शिक्षण व वकिलीअ‍ॅड. सुनील मनोहर यांचे शालेय शिक्षण रामदासपेठेतील सोमलवार शाळेत झाले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एलएल. बी. पदवी पूर्ण केली आहे. त्यापूर्वी त्यांनी जी. एस. महाविद्यालयातून बी. कॉम. पदवी मिळविली होती. ते एलएल. बी. मध्ये मेरिट आले होते. त्यांना ४ पदके व ४ अन्य पुरस्कार मिळाले होते. यानंतर त्यांनी १९८७ पासून वडील अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर हेच त्यांचे आदर्श आहेत. अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर यांची महाधिवक्तापदी नियुक्ती होतपर्यंत सुनील मनोहर त्यांच्यासोबत होते. यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे वकिली सुरू केली. अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर यांनी त्यांना सुरुवातीपासूनच प्रकरणे हाताळण्याची संधी दिली. त्यांनी उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे १९८९ मध्ये पहिल्यांदा युक्तिवाद केला होता.वरिष्ठ वकिलाचा दर्जा व गाजलेली प्रकरणे अ‍ॅड. सुनील मनोहर यांना २०११ मध्ये वरिष्ठ वकिलाचा दर्जा मिळाला. त्यांच्या वडिलांनाही हा दर्जा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील त्यांची अनेक प्रकरणे गाजली आहेत. त्यात डर्टी पिक्चर व अग्निपथ चित्रपटासंदर्भातील वाद, सार्वजनिक बांधकाम विभागातील ११९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पात्र कुलगुरूंची नियुक्ती करणे इत्यादी प्रकरणांचा समावेश आहे.