कुरिअर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून एका व्यक्तीने २२ वर्षीय तरुणीच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पुण्यातील कोंढावा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीने कुरिअर आल्याचे सांगून तरुणीच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तरुणीच्या तोंडावर स्प्रे फवारून तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती आहे. याप्रकरणी कोंढावा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास आरोपीने आरोपीने डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पीडितेच्या प्लॅटमध्ये गेला आणि तुमचे कुरिअर अल्याचे तिला म्हणाला. पीडिताने हे कुरिअर माझे नसल्याचे त्याला सांगितले. परंतु, तरीही तुम्हाला सही करावी लागेल, असे त्याने पीडितेला सांगितले. सही करण्यासाठी पीडितेने दरवाजा उघडला असता आरोपी तिच्या तोंडावर स्प्रे फवारला आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलमध्ये तिच्यासोबत सेल्फी काढत मी पुन्हा येईल, असे टाईप करून ठेवेले.
या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितेचा जाब नोंदवला. आरोपीने इमारतीच्या सुरक्षारक्षकांना कुरिअर बॉय असल्याचे सांगितले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्याची फारशी चौकशी केली नाही. पोलिसांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
पुणे शहराचे डीसीपी राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात बीएनएस कलम ६४, ७७ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी एकूण १० पथके तयार करण्यात आली. आरोपीने पीडितेवर कोणता स्प्रे फवारला? हे जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आले आहे.