शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 17:41 IST

सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की विद्यमान मुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लेक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर, आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की विद्यमान मुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लेक्ष लागले आहे. महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजेच 132 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेने 54 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या आहेत. 

फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक - दरम्यान, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिनही नेत्यांची आज (25 नोव्हेंबर) सायंकाळी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे आज सायंकाळपर्यंत दिल्लीत पोहोचतील, तर श्रीकांत शिंदे दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला 3-4 दिवसही लागू शकतात, असेही वृत्त आहे.

फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपचा शिंदेंसाठी 'बी' प्लॅन? -देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपवली गेली, तर भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्लॅन 'बी' काय असू शकतो? एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावर येतील का? हा प्रश्न आहे. अशा स्थितीत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर भाजप एकनाथ शिंदे यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण देऊ शकते आणि एकनाथ शिंदे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात.

पुन्हा 1 CM आणि 2 DCM चा फॉर्म्युला -माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रातात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा जुनाच याफॉर्म्युला पुढेही लागू राहणार असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स कायम आहे. या तिन्ही पदांसंदर्भातील नावे दिल्लीतूनच ठरवली जाणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा