साडेपाच लाख वैदर्भीय शेतकऱ्यांना महावितरणची कृषी संजीवनी

By Admin | Updated: June 29, 2014 00:37 IST2014-06-29T00:37:34+5:302014-06-29T00:37:34+5:30

महावितरणद्वारे राबविली जाणारी व यशस्वी झालेली कृषी संजीवनी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे विदर्भातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे.

Mahavitaran's Krishi Sanjivani has been distributed to 2.5 lakh farmers | साडेपाच लाख वैदर्भीय शेतकऱ्यांना महावितरणची कृषी संजीवनी

साडेपाच लाख वैदर्भीय शेतकऱ्यांना महावितरणची कृषी संजीवनी

प्रभाकर गायकवाड - वर्धा
महावितरणद्वारे राबविली जाणारी व यशस्वी झालेली कृषी संजीवनी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे विदर्भातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे एकूण ११०० कोटी रुपये बील थकीत आहे. पैकी ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे़ ही योजना पुनर्जीवित करण्याची घोषणा शासनाने अर्थसंकल्पात केली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यात ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे. राज्यासह विदर्भातील कृषी पंप धारकांकडे वीज देयकांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत.
ही थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणतर्फे कृषी संजीवनी योजना राबविण्यात आली होती. या योजनेत वीज देयक थकीत असणाऱ्या कृषी पंप धारकांचे व्याज माफ होणार होते. शिवाय केवळ सुरू देयकाचाच भरणा करायचा होता. राज्यात सर्वत्र दोन वेळा ही योजना राबविण्यात आली.
तथापि, या योजनेचा फारसा लाभ विदर्भातील कृषी पंपधारकांनी घेतला नाही. यामुळे ऊर्जामंत्री अजित पवार यांनी या योजनेला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास ११०० पैकी ६०० कोटी रुपयांचे व्याज माफ होऊन शेतकरी व महावितरणला संजीवनी मिळणार आहे़

Web Title: Mahavitaran's Krishi Sanjivani has been distributed to 2.5 lakh farmers