शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली; ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 14:46 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची काल निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती, तर आज महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल औसा दौऱ्यावर होते, यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केल्याचे समोर आले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाणही थांबवले होते. दरम्यान, आज पुन्हा महाराष्ट्र- गोवा सीमेवर त्यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. 

सलग दोन दिवस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान, आज  ठाकरे यांची कार महाराष्ट्र -गोव सीमेवर अडवल्याचे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बॅगा तपासल्यानंतर आयोगाच्या अधिकाऱ्यांवर संतापले होते. तर फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जात आहेत का? असा सवाल केला. 

'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

दरम्यान, आज बुधवार उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. ठाकरे गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवर इन्सुली चेक पोस्टवर उद्धव ठाकरे यांच्या गाडीची पुन्हा तपासणी करण्यात आली. ठाकरे गोवा विमानतळावर उतरुन कारने सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करत असताना इन्सुली चेक पोस्टवर त्यांची कार अडवली, यावेळी त्यांची गाडी ज्या अधिकाऱ्यांनी अडवली ते अधिकारी काही वेळातच गायब झाल्याची माहिती समोर आली. यावेळी उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. 

अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी

 काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यानंतर ठाकरे यांनी फक्त विरोधी पक्षांतील नेत्यांच्याच बॅगांची तपासणी सुरू असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बॅगांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. 

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची बारामती येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी अजित पवार उपस्थित होते, यावेळी अधिकाऱ्यांनी बॅगांची तपासणी केली, यावेळी बॅगांमध्ये चकल्या मिळाल्याचे दिसत आहे, दरम्यान अजित पवार अधिकाऱ्यांना 'खा बाबा खा' सांगत असल्याचे दिसत आहे, तर दुसरा डबाही तपासण्यासाठी देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे