शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आर्थिक नुकसान प्रकरण अजित पवारांसह संचालकांनी राजीनामा देण्याची गरज नाही

By admin | Updated: May 31, 2014 22:24 IST

आर्थिक तोटयाला बँकेचे संचालक व उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह ५० हून अधिक संचालक व अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक तोटयाला बँकेचे संचालक व उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह ५० हून अधिक संचालक व अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांची आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम ८८ नुसार पुढील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे याप्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असल्याने अजित पवार यांच्यासह संचालकांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे उजेडात आल्याने २०११ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कलम ८३ नुसार झालेल्या चौकशीमध्ये राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या कृती व अकृतीमुळे बँकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, 'कलम ८३ ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार कलम ८८ अन्वये चौकशी करण्यात येते. यावेळी बँकेचे संचालक व अधिकार्‍यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. ही चौकशी न्यायालयीन स्वरूपाची असल्याने यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता नाही.'काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनीया गांधी यांची हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच भेट त्याबाबत विचारणा केली असता लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुढे काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे प्राधान्यक्रम वेगळे असतात त्यामुळे या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. आगामी पावसाळी अधिवेशनावर सध्या लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, त्यामध्ये १३ विधयके मांडण्याचे नियोजन आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.