शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तासांत राज्यात ६७,०१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ६२ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 21:36 IST

मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

ठळक मुद्देराज्यात ६२ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्तमुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,०१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर कोरोनामुळे ५६८ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात सात लाखांच्या जवळपास अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात कोरोनाचा कहर अद्यापही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या ६७,०१३ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे ६२,२९८ जण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनामुळे ५६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ४०,९४,८४० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण ३३,३०,७४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,९९,८४० जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८१.३४ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिकमुंबई गेल्या चोवीस तासांमध्ये ७,४१० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. मुंबईत गेल्या चोवीस तासांत ८,०९० जण कोरोनामुक्त झाले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ८३ हजार ९५३ अॅक्टिव्ह केसेस आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवस इतका आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई