शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

Coronavirus in Maharashtra: मोठी उसळी! राज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या 63 हजारावर; 349 मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 9:25 PM

Coronavirus in Maharashtra: राज्यात काल 55,411 नवे कोरोनाबाधित सापडले होते. 309 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईत हा आकडा 9327 एवढा होता.

राज्यात काही दिवसांत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेत असून लॉकडाऊनची रुपरेषा ठरविण्यात व्यस्त आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर आजची नवीन कोरोनाबाधितांची (Corona Virus) संख्या भयावह आहे. राज्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्याने 63000 चा पल्ला पार केला आहे. (Maharashtra reports 63,294 new #COVID19 cases, 34,008 recoveries and 349 deaths in the last 24 hours)

Lockdown: लॉकडाऊनची तयारी! टास्क फोर्सची बैठक संपत नाही तोच मुख्यमंत्र्यांची सचिवांसोबत बैठक

राज्यात गेल्या 24 तासांत 63,294 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 34,008 बरे झाले झाले आहेत. या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ही 34,07,245 झाली आहे. एकूण मृतांचा आकडा 57,987 झाला असून राज्यात सध्या 5,65,587 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मुंबईमध्ये कोरोनाचे 9,989 नवे रुग्ण सापडले आहेत. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 7,201 नवे कोरोनाबाधित. 63 मृत्यू. 3,240 बरे झाले. राज्यात आज तब्बल 7883 रुग्णांची वाढ झाली आहे.  

Corona Task Force: रुग्णांची 6 मिनिटे वॉक टेस्ट घ्या, मगच दाखल करा; टास्क फोर्सकडून महत्वाचे सल्ले

कालची आकडेवारी काय...राज्यात काल 55,411 नवे कोरोनाबाधित सापडले होते. 309 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईत हा आकडा 9327 एवढा होता. पुणे शहरातील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने मागील शनिवारपासून कडक निर्बंध जाहीर केले आहे. दिवसा जमावबंदी तर सायंकाळी ६ नंतर कडक संचारबंदी लागू आहे. मात्र, आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत ३६ टक्क्यांवर पोहचलेला पॉझिटिव्हिटी रेट आता कमी होऊ लागला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. 

Lockdown: लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर; उद्धव ठाकरे, अजित पवारांमध्ये सकाळी महत्वाची बैठक होणार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस