Take a 6 minute walk test of the patient, then admit; Important advice from the task force meeting uddhav Thackeray | Corona Task Force: रुग्णांची 6 मिनिटे वॉक टेस्ट घ्या, मगच दाखल करा; टास्क फोर्सकडून महत्वाचे सल्ले

Corona Task Force: रुग्णांची 6 मिनिटे वॉक टेस्ट घ्या, मगच दाखल करा; टास्क फोर्सकडून महत्वाचे सल्ले

कोरोनाच्या मोठ्या (Corona Wave ) लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची (Oxygen plant) उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने चर्चा झाली. महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Covid Task Force gave suggestions in Meeting with CM Uddhav Thackeray)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीला केवळ टास्क फोर्सचे सदस्य आणि मी होतो, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच या बैठकीत राज्यातील ऑक्सिजनच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे टोपे म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी. डॉ अविनाश सुपे, डॉ उडवाडिया, डॉ वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ झहीर विराणी, डॉ ओम श्रीवास्तव, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

Lockdown: लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर; उद्धव ठाकरे, अजित पवारांमध्ये सकाळी महत्वाची बैठक होणार


राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे राज्यात कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये जसा ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे तसाच प्लांट उभारण्याचा मुद्दा मांडण्यात आला. हवेतून ऑक्सिजन काढून घेण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच मोठमोठे सिलिंडर जे लिक्विड ऑक्सिजनने भरले जातात, ते कसे लवकरात लवकर कसे भरता येतील यावर चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले. 


टास्क फोर्सने दिल्या सुचना  
९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे, ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सुचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणेएमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा  मोठ्या प्रमाणावर  उपयोग करून घेणे आदि सुचना करण्यात आल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Take a 6 minute walk test of the patient, then admit; Important advice from the task force meeting uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.