शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांना दिलासा! १८ हजार कोटींची बिले मार्गी लागणार; मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:53 IST

"आता मागेल तिथे रस्ते होणार नाहीत!" बांधकाम मंत्र्यांनी स्पष्ट केले रस्ते बांधणीचे नवीन 'थीम' धोरण

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील कंत्राटदारांची बांधकाम विभागाकडे १८ हजार कोटींची बिले अदा करणे बाकी आहे. ती बिले येत्या दोन ते चार महिन्यांत अदा होतील, असे बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. तसेच यापुढे आता रस्ते बांधणी करताना थीम समोर ठेवूनच रस्ते बांधणी केली जाईल, मागेल तेथे रस्ते होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भोसले यांनी मराठवाडा प्रादेशिक विभागाचा आढावा येथे येऊन घेतला. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले, आपले खाते सध्या प्रचंड देण्यांमध्ये दबलेले आहे. त्यावर ते म्हणाले, १८ हजार कोटींची देणी आहे. सरकारच्या मानाने ती काही जास्त नाही. लवकरच ती देणीदेखील अदा होतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकडा १८ हजार कोटींचा असून इतर विभागाची देणीदेखील बांधकाम विभागाच्या माथ्यावर मारली जात असल्यामुळे आकडा जास्त आहे. प्रलंबित देयकांसाठी टप्प्याटप्प्याने तरतूद येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकमतने १६ एप्रिलच्या अंकातील वृत्तामधून ‘कंत्राटदारांच्या देण्यांमुळे कामे ठप्प’ पडल्याची वस्तुस्थिती मांडली होती. मंत्री भाेसले यांनी त्याचा संदर्भ घेत किती देणी आहे, कधीपर्यंत देणार यावर स्पष्टीकरण दिले.

अखंड पुलाचे काम पीडब्ल्यूडीकडे नाहीछत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर अखंड उड्डाणपूल बांधण्याचा समावेश बजेटमध्ये केला आहे. त्याबाबत मंत्री भोसले म्हणाले, ते काम आमच्याकडे आलेले नाही. युडी किंवा एमएसआरडीसीकडे असेल. शेंद्रा ते बिडकीन रस्त्याचे काम बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी बजेट, भूसंपादनाची तरतूद केली आहे. तसेच संभाजीनगर ते शिरूर रस्त्याचे काम हाेत आहे. अहिल्यानगर ते पुणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य असणार आहे.

हायब्रीड ॲन्युटीचा अहवाल मागविलाएमएसआयडीसी आणि बांधकाम विभाग यांच्यातील कामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड होणार नाही. दक्षता विभागाकडून हॅम वन, हॅम टू (हायब्रीड ॲन्युटी मॉडेल) मधील कामांचा अहवाल मागविला आहे. एक महिन्याच्या आत त्याचा अहवाल येणार आहे. काही कामे अपूर्ण आहेत, त्याची कारणे अहवालानंतर समोर येतील. कंत्राटदारांनासुद्धा दर्जाबाबत तडजोड करता येणार नाही. एमएसआयडीसीच्या कामांवर करडी नजर असल्याचेही भाेसले यांनी सांगितले.

१५०० कि.मी.साठी अर्थसाहाय्य : थीम समोर ठेवून रस्ते बांधणारपूर्वी एशियन डेव्हलपमेंट बँक होती आता एआयईबी झाली आहे. बँकेकडून पंधराशे किलोमीटरच्या रस्त्याला पहिला टप्प्यात अर्थसाहाय्य मिळाले आहे. यापुढे रस्ते बांधताना थीम समोर ठेवून रस्ते घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. जसे विमानतळ, पोर्ट, दोन हायवे जोडणे, वाढवण बंदराला कनेक्टीव्ही देण्यासारखे रस्ते असतील. तशा रस्त्यांची यादी शॉर्टलिस्ट केली आहे. कोअर नेटवर्क राज्यभरासाठी तयार केले आहे. पूर्वी कसेही, कुठलीही कामे घेण्यात येत होती. आता तसे होणार नाही. राज्याची अर्थव्यवस्था वाढण्यासाठी रस्त्यांचा हातभार मोठा असेल, असे भोसले यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Contractors: ₹18,000 Crore Bills to be Cleared Soon

Web Summary : Maharashtra's construction contractors will receive ₹18,000 crore in pending payments within two to four months. Minister Shrirangraje Bhosale announced a new theme-based approach to road construction, prioritizing connectivity to ports and highways. Focus will be on quality and timely completion of projects.
टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरhighwayमहामार्ग