शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वन!; मंत्री देसाई यांनी गुजरातचा दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 2:00 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या फोटोंसह सोमवारी काही दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात आली आणि त्यात नंबर वनचा दावा करण्यात आला.

यदु जोशीमुंबई : गुजरातमध्ये देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आली असल्याचा दावा तेथील राज्य सरकारने केल्यानंतर महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने त्यावर पलटवार केला आहे. ‘सर्वाधिक परकीय गुंतवणूक नि:संशयपणे महाराष्ट्रातच होत आहे’ असा दावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना केला. महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात पळवून नेण्याचा तेथील भाजप सरकारचा डाव असल्याची टीका प्रदेश काँग्रेसने केली आहे. त्यामुळे गुंतवणुकीवरून आता दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या फोटोंसह सोमवारी काही दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात आली आणि त्यात नंबर वनचा दावा करण्यात आला. गुजरातमध्ये २०१९-२० या वित्तीय वर्षात परकीय गुंतवणुकीत तब्बल २४० टक्के वाढ झाली. एप्रिल-सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांत १.१९ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक गुजरातमध्ये झाली. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ५३ टक्के एकट्या गुजरातमध्ये झाली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. देशाच्या एकूण निर्यातीपैकी या सहा महिन्यांच्या काळात २३ टक्के निर्यात गुजरातने केली, प्रस्तावित गुंतवणुकीतही गुजरातच नंबर वन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने गेली तीन-चार वर्षे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वनवर असल्याचे नमूद केले आहे. गुजरात देत असलेली आकडेवारी दिशाभूल करणारी आहे. परकीय गुंतवणुकीचा आकडा त्यांनी शेअरच्या विक्रीचे आकडे धरून केला आहे.

गुंतवणुकीवरून आता महाराष्ट्र-उत्तर प्रदेश संघर्षउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यराज हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन  प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातमध्ये पळविण्याचे प्रयत्न आधीपासूनच होत आहेत, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात