Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:25 IST2026-04-09T10:08:15+5:302026-04-09T12:25:14+5:30

Today Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 9 April 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्�..

Maharashtra Marathi News Live Updates 9 April 2026: US Iran Ceasefire, Israel Lebanon conflict, Donald Trump, Ashok Kharat Crime Inquiry, West Bengal Election, PM Narendra Modi, Baramati Bypoll, CM Devendra Fadnavis, Sunetra Pawar, IPL 2026 | Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती

Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती

Today Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 9 April 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

09 Apr, 26 : 12:32 PM

इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ

मध्य पूर्व आशियातील धुमसत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित झाला असला, तरी शांतता प्रक्रियेवरून नवा वाद पेटला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स हे दीर्घकालीन करारासाठी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेचे नेतृत्व करणार आहेत. मात्र, या प्रक्रियेत पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून असलेली भूमिका इस्रायलला अजिबात मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. "पाकिस्तान हा विश्वासार्ह देश नाही, अमेरिकेने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला आहे," अशा शब्दांत भारतातील इस्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

वाचा सविस्तर 

09 Apr, 26 : 12:32 PM

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?

मध्य पूर्व आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्येयुद्धविरामाचा प्रयत्न सुरू असतानाच, आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. "जर युद्धविरामाच्या अटी पाळल्या गेल्या नाहीत आणि होर्मुजची कोंडी फोडली नाही, तर इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल," अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

वाचा सविस्तर 

09 Apr, 26 : 12:31 PM

राष्ट्रवादी नेत्यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट

बारामती मतदारसंघातून उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बारामतीत अजित पवार यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला आहे. 

09 Apr, 26 : 12:21 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून, सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध विजय सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेसने बारामतीमधून आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली.

09 Apr, 26 : 11:34 AM

काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागली आहे. यापुर्वी अजितदादांनी कॉंग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणे ही अजितदादांना आदरांजली ठरेल. तरी माझी कॉंग्रेस पक्षाला नम्र विनंती आहे की कृपया आपण आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

09 Apr, 26 : 11:30 AM

बिनविरोध निवडणुकीसाठी रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट

09 Apr, 26 : 10:44 AM

बारामतीची निवडणूक बिनविरोध करणं योग्य; शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला

"काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही. पण जी जागा रिक्त झाली ती अपघातामुळे. महाराष्ट्राने एक कतृत्ववान प्रतिनिधी गमावला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल की या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे हा माझा सल्ला आहे," असं शरद पवार म्हणाले.
 

09 Apr, 26 : 10:33 AM

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती निधन

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनावरचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात घडला. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण महसूल अधिकाऱ्याच्या निधनाने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

09 Apr, 26 : 10:30 AM

अमेरिकेला शांतता हवीय की इस्रायलचं युद्ध? इराणचा थेट सवाल

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला. अमेरिकेला आता एकतर युद्ध निवडावं लागेल किंवा युद्धविराम, असे इराणने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इस्रायलच्या माध्यमातून लेबनॉनमध्ये युद्ध सुरू ठेवणे आणि इराणसोबत शांततेची भाषा करणे, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू शकणार नाहीत, अशा शब्दांत इराणने आपला भूमिका जाहीर केली आहे.
 

09 Apr, 26 : 10:29 AM

लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव! १० मिनिटांत १०० पेक्षा जास्त ठिकाणं उद्ध्वस्त

युद्धविरामानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले चढवले आहेत. इस्रायली हवाई दलाच्या ५० लढाऊ विमानांनी अवघ्या १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणांवर १६० बॉम्ब फेकले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १८२ लोकांचा मृत्यू झाला असून ८०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिजबुल्लाह-इस्रायल युद्धात एका दिवसात झालेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे.
 

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 9 April 2026: US Iran Ceasefire, Israel Lebanon conflict, Donald Trump, Ashok Kharat Crime Inquiry, West Bengal Election, PM Narendra Modi, Baramati Bypoll, CM Devendra Fadnavis, Sunetra Pawar, IPL 2026