Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 23:33 IST2026-04-09T10:08:15+5:302026-04-09T23:33:02+5:30
Today Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 9 April 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्�..

Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
Today Breaking Maharashtra News Live Updates in Marathi, 9 April 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...
LIVE
09 Apr, 26 : 10:49 PM
इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्ज यांनी म्हटले आहे की, "लेबनानमध्ये आयडीएफने हिजबुल्लाहला जोरदार तडाखा दिला आहे. त्यामुळे ते भांबावले आहेत. इस्रायली संरक्षण दल पूर्णपणे सज्ज आहे आणि इराणने जर इस्रायलवर हल्ला केला, तर निष्ठूरपणे उत्तर दिले जाईल."
लेबनानमध्ये हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त लोक मारले गेले. इस्रायलचे मंत्री कात्ज यांनी मारले गेलेले लोक दहशतवादी होते असे म्हटले आहे.
09 Apr, 26 : 09:02 PM
मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली आहे. सायंकाळी सहा वाजता टर्मिनल १ मध्ये ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशामक दल दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. तसेच विमानांचे उड्डाणही थांबवण्यात आले आहे.
Fire at Mumbai airport @CSMIA_Official@MumbaiPolice@CPMumbaiPolice#fireatmumbaiairportpic.twitter.com/XQhniKiZjU
— Anand Prasad Ram (@prince7anand) April 9, 2026
09 Apr, 26 : 05:24 PM
महाराष्ट्रात लोकशाही उरलेली नाही, बारामतीत लढण्यावर करुणा मुंडे ठाम
महाराष्ट्रात लोकशाही उरलेली नाही. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाने बारामती निवडणुकीत माघार घेणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे आपल्या मनाप्रमाणे महाराष्ट्र चालवणार असतील तर ते मी होऊ देणार नाही. मी देखील माघार घेण्याचा विचार करत होते परंतु मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांचा फोटो असलेली एक पोस्ट मी पाहिली. त्यात धनंजय मुंडे यांनी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून माघार घ्यायला लावल्याचे म्हटले होते. ही माहिती ऐकून आणि पोस्ट पाहून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला असं करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
09 Apr, 26 : 05:23 PM
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी FIR का घेतला नाही?; सुप्रिया सुळेंचा सवाल
दिवंगत अजित दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी FIR दाखल करायला रोहितला काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. महाराष्ट्रात ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला? हा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
09 Apr, 26 : 04:49 PM
खासदारांचा निधी अडवला जातोय, प्रणिती शिंदेंचा पालकमंत्र्यांवर निशाणा
मी काँग्रेसची खासदार असल्यामुळे जाणीवपूर्वक डीपीडीसीचा निधी अडवला जात आहे असा आरोप करत प्रणिती शिंदे यांनी भाजपा, राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांवर टीका केली. प्रणिती यांनी शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मोहोळ तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत सरकार किंवा पालकमंत्री कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
09 Apr, 26 : 04:33 PM
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी FIR का घेतला नाही?; सुप्रिया सुळेंचा सवाल
दिवंगत अजित दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी FIR दाखल करायला रोहितला काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. महाराष्ट्रात ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला? हा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
09 Apr, 26 : 04:24 PM
इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
इस्रायलने गेल्या २४ तासांमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये २०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे, अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
इराणकडून अमेरिकेला शस्त्रसंधीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला गेला असतानाच मृतांचे आणि जखमींचे आकडे समोर आले आहे.
इस्रायल शस्त्रसंधी असताना लेबनानवर हल्ले करू शकत नाही, अशी भूमिका इराणची आहे. इस्रायलने हल्ले थांबवले नाही, तर तत्काळ शस्त्रसंधी करारातून बाहेर पडू असे इराणने अमेरिकेला म्हटले आहे.
09 Apr, 26 : 03:55 PM
भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
"तुला मुलगाच होईल..." असे सांगून पीडित गर्भवती महिलेवर भोंदू खरात याने विधी करण्याच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास गुरुवारपासून वेग पकडणार आहे. या गुन्ह्याच्या तपासात खरातच्या सर्व काळ्या कारनाम्यांचा उलगडा व मूळ 'मोडस'चा पर्दाफाश होऊ शकतो. कारण याबाबत विविध स्वरूपाचे महत्त्वाचे तांत्रिक पुरावेसुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत. वाचा सविस्तर
09 Apr, 26 : 03:50 PM
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी FIR का घेतला नाही?; सुप्रिया सुळेंचा सवाल
दिवंगत अजित दादांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी FIR दाखल करायला रोहितला काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. महाराष्ट्रात ज्या सरकारमध्ये दादा होते, त्या सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला? हा प्रश्न महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
09 Apr, 26 : 03:33 PM
फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. १० एप्रिल २०२६ पासून टोल वसुलीच्या नियमांत मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमांनुसार, आता टोल प्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे बंद केली जाणार असून डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे.
09 Apr, 26 : 03:30 PM
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र
अमेरिका आणि इराण यांच्यात २ आठवड्यांसाठी युद्धविराम झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जहाजांची सुरक्षित वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी पाश्चात्य देशांनी आपला प्लॅन बी एक्टिव्ह केला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी फ्रान्सच्या नेतृत्वाखाली सुमारे १५ देश या संरक्षण मोहिमेची योजना आखत असल्याचं जाहीर केले. ही मोहीम पूर्णपणे बचावात्मक असेल आणि इराणच्या समन्वयाने चालवली जाईल. तेल आणि इतर वस्तू वाहून नेणारी व्यापारी जहाजे कोणत्याही धोक्याशिवाय होर्मुझमधून मार्गक्रमण करतील हे सुनिश्चित करणे हा प्लॅनचा हेतू आहे.
09 Apr, 26 : 01:33 PM
भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने
भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची यादी वाढत असून आता त्याच्या गुन्हेगारीची साखळीतील जुन्या आणि धक्कादायक प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. खरातने वयाच्या २० व्या वर्षी, म्हणजेच १९८० मध्ये एका नातेवाईक महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या घटनेला या चर्चेच्या निमित्ताने पुन्हा उजाळा दिला जात आहे. वाचा सविस्तर
09 Apr, 26 : 01:28 PM
डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
डॉक्टर कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सुरुवातीला ज्या घटनेला नैसर्गिक मृत्यू मानलं जात होते, ती प्रत्यक्षात एक नियोजित हत्या असल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलीस तपासात आरोपी पतीने आपल्या गर्लफ्रेंडला केलेले काही चॅट्स समोर आले असून त्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. वाचा सविस्तर
09 Apr, 26 : 01:00 PM
आसाम, केरळम, पुद्दुचेरीमध्ये मतदानासाठी उत्साह
सकाळी ११ वाजेपर्यंत आसाममध्ये ३८ टक्के मतदान, तर केरळममध्ये ३२ आणि पुद्दुचेरीमध्ये ३७ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
09 Apr, 26 : 12:32 PM
इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
मध्य पूर्व आशियातील धुमसत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित झाला असला, तरी शांतता प्रक्रियेवरून नवा वाद पेटला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स हे दीर्घकालीन करारासाठी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेचे नेतृत्व करणार आहेत. मात्र, या प्रक्रियेत पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून असलेली भूमिका इस्रायलला अजिबात मान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. "पाकिस्तान हा विश्वासार्ह देश नाही, अमेरिकेने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर केला आहे," अशा शब्दांत भारतातील इस्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
09 Apr, 26 : 12:32 PM
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
मध्य पूर्व आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्येयुद्धविरामाचा प्रयत्न सुरू असतानाच, आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. "जर युद्धविरामाच्या अटी पाळल्या गेल्या नाहीत आणि होर्मुजची कोंडी फोडली नाही, तर इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल," अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.
09 Apr, 26 : 12:31 PM
राष्ट्रवादी नेत्यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट
बारामती मतदारसंघातून उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बारामतीत अजित पवार यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला आहे.
09 Apr, 26 : 12:21 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून, सुनेत्रा पवार यांचा बिनविरोध विजय सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेसने बारामतीमधून आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली.
09 Apr, 26 : 11:34 AM
काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागली आहे. यापुर्वी अजितदादांनी कॉंग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणे ही अजितदादांना आदरांजली ठरेल. तरी माझी कॉंग्रेस पक्षाला नम्र विनंती आहे की कृपया आपण आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
09 Apr, 26 : 11:30 AM
बिनविरोध निवडणुकीसाठी रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा… pic.twitter.com/aRiQygb5u7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2026
09 Apr, 26 : 10:44 AM
बारामतीची निवडणूक बिनविरोध करणं योग्य; शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला
"काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आम्ही त्यांना काही सांगू शकत नाही. पण जी जागा रिक्त झाली ती अपघातामुळे. महाराष्ट्राने एक कतृत्ववान प्रतिनिधी गमावला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल की या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे हा माझा सल्ला आहे," असं शरद पवार म्हणाले.
09 Apr, 26 : 10:33 AM
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती निधन
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनावरचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात घडला. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण महसूल अधिकाऱ्याच्या निधनाने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
09 Apr, 26 : 10:30 AM
अमेरिकेला शांतता हवीय की इस्रायलचं युद्ध? इराणचा थेट सवाल
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला. अमेरिकेला आता एकतर युद्ध निवडावं लागेल किंवा युद्धविराम, असे इराणने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इस्रायलच्या माध्यमातून लेबनॉनमध्ये युद्ध सुरू ठेवणे आणि इराणसोबत शांततेची भाषा करणे, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू शकणार नाहीत, अशा शब्दांत इराणने आपला भूमिका जाहीर केली आहे.
09 Apr, 26 : 10:29 AM
लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव! १० मिनिटांत १०० पेक्षा जास्त ठिकाणं उद्ध्वस्त
युद्धविरामानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले चढवले आहेत. इस्रायली हवाई दलाच्या ५० लढाऊ विमानांनी अवघ्या १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणांवर १६० बॉम्ब फेकले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १८२ लोकांचा मृत्यू झाला असून ८०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिजबुल्लाह-इस्रायल युद्धात एका दिवसात झालेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे.