शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अटकेच्या भीतीने फरार, पोलीस पथक घरी पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:21 IST

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

31 Mar, 26 07:19 PM

भोंदू खरातच्या पत्नीला पोलीस करणार अटक

भोंदू अशोक खरातच्या पत्नीला अटक करण्यासाठी महिला पोलीस पथक शिर्डी येथील घरी पोहचले. अटकेच्या भीतीने कल्पना खरात फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस खरात यांच्या घरी तपास करत आहेत.  

31 Mar, 26 06:59 PM

"इराणला आम्ही संपवलंय, आता तुम्ही हिंमत दाखवा!"

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर झाला आहे. 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून होणारी तेल वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक देशांना जेट इंधनाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जगभरातील नेत्यांना सुनावले आहे. (सविस्तर वाचा)

31 Mar, 26 05:47 PM

"अमेरिका हे लक्षात ठेवेन", डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट, फ्रान्सला दिला इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सवर आगपाखड केली आहे. ट्रम्प म्हणाले, "इस्रायलला लष्करी शस्त्रास्त्रे घेऊन जाणाऱ्या विमानांना फ्रान्सने आपल्या हवाई क्षेत्रातून जाऊ दिले नाही. ज्या 'कसाई इराण'चा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला आहे, त्याच्या बाबतीत फ्रान्सची भूमिका अत्यंत असहकार्याची राहिली आहे. अमेरिका हे लक्षात ठेवेल", असा इशारा ट्रम्प यांनी फ्रान्सला दिला. 

31 Mar, 26 05:26 PM

शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी उद्या होणार नाही

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात होणारी उद्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी आणखी लांबणीवर गेली. येत्या २३ एप्रिलला या खटल्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

31 Mar, 26 04:06 PM

वसईत ४ वर्षांच्या चिमुकल्यावर काढला वडिलांचा राग

वसईमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या भांडणाचा राग एका चार वर्षांच्या निष्पाप मुलावर काढला. आरोपीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत मुलाला जमिनीवर आपटलं आणि बेदम मारहाण केली. या अमानुष कृत्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून, तो पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण आहे. वाचा सविस्तर

31 Mar, 26 03:41 PM

गुजरातमध्ये घराला लागली भीषण आग

गुजरात येथे सुरतच्या लिंबायत एक्सटेंशनमधील एका घराला लागलेल्या भीषण आगीत पाच महिलांसह एका मुलाचा मृत्यू झाला. आगीमुळे घरात अडकलेल्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अग्निशमन दल आग विझवण्यासाठी पोहोचले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ज्वलनशील रसायनांच्या संशयित स्फोटामुळे ही आग लागल्याचे बोलले जाते. 

31 Mar, 26 03:25 PM

'हे युद्ध लवकर थांबवा', दलाई लामांचे इराण, अमेरिका, इस्रायल, रशिया, युक्रेनला आवाहन

तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी जगात सुरू असलेल्या युद्धांवर भाष्य केले आहे. कोणत्याही संघर्षावर तोडगा काढायचा असेल, मग पश्चिम आशियात असो की रशिया आणि युक्रेनमधील... संवाद, समजूतदारपणा आणि एकमेकांचा आदरावरच असला पाहिजे. मी विनंती करतो आणि आग्रहाने सांगेन की, हिंसा आणि युद्ध लवकरच संपवावी, असे दलाई लामा म्हणाले आहेत. 

31 Mar, 26 01:26 PM

माजी टेनिसपटू लिअँडर पेस भाजपात, मुख्यालय जाऊन घेतलं सदस्यत्व

भारताचा माजी टेनिस पटू लिअँडर पेसने मंगळवारी (31 मार्च) औपचारिकपणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जाऊन पक्षाचे सदस्त्व घेतले. महत्वाचे म्हणजे, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही एक महत्वाची घटना मानली जात आहे. तत्पूर्वी, कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांचीही त्याने भेट घेतली होती.

31 Mar, 26 12:52 PM

भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची गोळ्या झाडून हत्या

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची मंगळवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सेवढा चुंगी चौकात सकाळी ८:३० च्या सुमारास वॉर्ड क्रमांक १ च्या नगरसेवकावर हा जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

31 Mar, 26 12:45 PM

शीतला मंदिरात चेंगराचेंगरी कशी झाली?

बिहारच्या नालंदा येथील मघडा शीतला मंदिरात मंगळवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सांगितलं की, ते आज शीतला देवीच्या दर्शनासाठी पाटण्याहून आले होते. मंदिर परिसरात अचानक गोंधळ उडाला आणि लोक एकमेकांवर पडू लागले, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रशासकीय नियोजनातील त्रुटींमुळेच हा मोठा अपघात घडल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. वाचा सविस्तर

31 Mar, 26 11:43 AM

नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू

बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतला मंदिर येथे ही घटना घडली. वाचा सविस्तर

31 Mar, 26 11:24 AM

पश्चिम बंगालन निवडणुकीसाठी भाजपची १३ उमेदवारांची चौथी यादी जाहीर 

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ साठी भाजपने आपली १३ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी मैनागुडी मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात आला आहे.

31 Mar, 26 10:58 AM

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका; बळीराजावर अस्मानी संकट

धुळे शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा मोठा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला असून, यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाजरी, हरभरा आणि मका या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे आणि साक्री तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा सडण्याची भीती देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.  शासनाकडून पंचनामे करूनही नुकसानभरपाई वेळेवर मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे लवकर पूर्ण करून नुकसानभरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

31 Mar, 26 10:57 AM

शिर्डीकडे जाणारे विमान येवल्याच्या पूर्व भागात घिरट्या; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे एक प्रवासी विमान येवला शहराच्या पूर्व भागात वारंवार घिरट्या घालत असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक आकाशात फिरणाऱ्या विमानामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि घबराट पसरली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी परिसरात खराब हवामानामुळे विमानाला लँडिंग करता आले नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानाचा मार्ग बदलून ते सुरत विमानतळावर उतरवण्यात आले.

31 Mar, 26 10:57 AM

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांनी नुकसानीची केली पाहणी

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील पापरी गावात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, पेरू यांसह अनेक फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अमित ठाकरे यांनी शेतीच्या नुकसानीचा आढावा घेत, हा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

31 Mar, 26 10:56 AM

अमरावती शहरात मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी, दोन दिवस विदर्भात उकाड्यातून दिलासा

विदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. विशेषतः अमरावती जिल्ह्यात मागील आठवड्यात तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी रस्तेही सुनसान दिसत होते. दरम्यान, हवामान विभागाने 30 मार्च रोजी अमरावतीसह अकोला, बुलढाणा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. हा अंदाज आता खरा ठरला असून 30 मार्चच्या सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्याने जोरदार पावसाने हजेरी लावली... या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 1 आणि 2 एप्रिल रोजी अमरावतीसह वर्धा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस तापमान स्थिर राहणार असून त्यानंतर घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

31 Mar, 26 10:55 AM

अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यावर पाणी; भोकरदनमध्ये मंडप उडून गोंधळ

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने एका लग्नसोहळ्यावर अक्षरशः पाणी फेरले. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेला विवाह सोहळा काही क्षणांतच गोंधळ आणि धावपळीत बदलला. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची तयारी जोरात सुरू असतानाच हवामानात अचानक बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे उभारलेला मंडप कोसळला. मंडपातील सजावट, साहित्य आणि अन्नाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

31 Mar, 26 10:54 AM

CM फडणवीसांच्या विश्वासू, मेट्रो वूमन ते मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त; कोण आहेत अश्विनी भिडे?

मुंबईच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. वाचा सविस्तर...

31 Mar, 26 10:47 AM

मोठी बातमी: इराणचा कुवेतवर थेट हल्ला!

पश्चिम आशियातील युद्धाची आग आता अधिकच भडकू लागली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता शेजारील देशांपर्यंत पोहोचला असून, इराणने कुवेतच्या 'अल-साल्मी' या महाकाय तेलवाहू जहाजाला लक्ष्य केले आहे. मंगळवारी पहाटे दुबई बंदराजवळ उभ्या असलेल्या या जहाजावर इराणने थेट हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यामुळे जहाजाला मोठी आग लागली असून, समुद्रात तेल गळती होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

31 Mar, 26 10:46 AM

युद्धाचा 'THE END' होणार? ट्रम्प यांचा मोठा यूटर्न!

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला एक महिना उलटून गेला आहे. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प इराणसोबतचेयुद्ध फार अधिक खेचण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. 'होर्मुज सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याशिवायही युद्ध संपवण्याची तयारी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे बोलून दाखवल्याचे समजते. जर हा जलमार्ग जबरदस्तीने खुला करण्यासाठी थेट लष्करी कारवाई केली, तर युद्ध नियोजित वेळेपेक्षा ४ ते ६ आठवडे अधिक लांबू शकते, असे ट्रम्प प्रशासनाला वाटते. होर्मुज स्ट्रेट खुला करण्यासाठी US नंतरही स्वतंत्रपणे ऑपरेशन आखू शकतो.

वाचा सविस्तर 

31 Mar, 26 10:44 AM

मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे

ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त असतील. त्या मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारतील. भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव असून मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकदेखील आहेत. त्यांच्या रुपाने मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच महिला आयुक्त विराजमान होणार आहे. एकीकडे महापौर रितू तावडे तर दुसरीकडे आयुक्त भिडे असे महापालिकेत महिलाराज येत आहे.

वाचा सविस्तर 

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरMaharashtraमहाराष्ट्रLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईAshok Kharatअशोक खरात