Latest Marathi News LIVE Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर पटोलेंची प्रतिक्रिया

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:51 IST2026-04-02T10:08:04+5:302026-04-02T16:51:29+5:30

अमेरिकेच्या धमक्या, इस्रायलचे हल्ले आणि इराणचे प्रतिहल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीवरून निर्माण झालेला तणाव, तेल आणणारी जहाजं अडकून पडल्याने जगभरातील इंधन ...

Maharashtra Marathi News Live Updates 2 April 2026: US Israel Iran War, Donald Trump, Ashok Kharat Crime case inquiry, IPL 2026, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, LPG Crisis, Rain in Maharashtra | Latest Marathi News LIVE Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर पटोलेंची प्रतिक्रिया

Latest Marathi News LIVE Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर पटोलेंची प्रतिक्रिया

अमेरिकेच्या धमक्या, इस्रायलचे हल्ले आणि इराणचे प्रतिहल्ले, होर्मुझ सामुद्रधुनीवरून निर्माण झालेला तणाव, तेल आणणारी जहाजं अडकून पडल्याने जगभरातील इंधन टंचाई, भारतातील एलपीजीचा तुटवडा, महाराष्ट्रात चर्चेत असलेलं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, राजकारण आणि आयपीएलचे वारे, या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... 

LIVE

Get Latest Updates

02 Apr, 26 : 06:37 PM

अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

 राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

02 Apr, 26 : 06:31 PM

काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. 

02 Apr, 26 : 04:56 PM

पुण्यात वादळी पावसाचे थैमान

सध्या महाराष्ट्रावर संकट घोंगावतय. वादळी पाऊस आणि गारपिटीनं काही ठिकाणी थैमान घातल्याचं चित्र आहे. पुणे शहरासहित जिल्ह्यातही अचानक आलेल्या अवकाळीनं कहर केला आहे. त्यामध्ये शेती आणि घरांचं मोठं नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर ग्रामीण भागात अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. शेतकरी आणि ग्रामस्थांचं नुकसान झालं. 

02 Apr, 26 : 04:51 PM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर पटोलेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतेच भारतीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावांचा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा वैयक्तिक विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

02 Apr, 26 : 04:47 PM

ठाण्यातील मुंब्रा येथे जुन्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू दोघेजण जखमी 

ठाण्यातील मुंब्रा येथे जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल आहे. तर दोघेजण जखमी झाले आहे 

02 Apr, 26 : 04:30 PM

काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. 

02 Apr, 26 : 03:45 PM

पुण्यात तासाभरापासून पावसाची धुव्वादार बॅटिंग; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, झाडांच्या फांद्या कोसळल्या

 पुण्यात दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

02 Apr, 26 : 03:41 PM

पुण्यात मुसळधार पाऊस, पुणेकरांनी उडाली तारांबळ

पुण्यात भरदुपारी अंधारमय वातावरण, सिंहरोड परिसरात मुसळधार पावसाने लावली हजेरी, पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचले. अचानक पडलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. पुण्यातील विविध भागात जून महिन्यासारखा पाऊस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

02 Apr, 26 : 03:30 PM

'इराण-इस्रायल युद्ध थांबावे म्हणून मध्यस्थीसाठी आम्ही तयार', रशियाने ठेवला प्रस्ताव

२८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेले इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी आता रशियाने पुढाकार घेतला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या नव्या भूमिकेवर बोलताना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनने म्हटले आहे की, जर गरज असेल तर इराण युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास रशिया तयार आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल आखाती देश आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणार आहेत. 

02 Apr, 26 : 03:14 PM

डोंबिवलीच्या टिळकनगर हद्दीत लैंगिक अत्याचाराचे दोन धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत एका २२ वर्ष महिलेवर ३ रिक्षा चालकांनी केला सामूहिक अत्याचार, तर दुसऱ्या घटनेत ५ वर्षे चिमुकलीवर एका पूजा सांगणाऱ्या एका इस्माने केला विनयंभग. पहिल्या प्रकांरांतील आरोपी रिक्षा चालक चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण, उमेश वर्मा या तिघांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली. तर दुसऱ्या घटनेत ५ वर्ष चिमुकलीवर एका पूजा सांगणारां आरोपी हरेश भावे ( वय 46) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

02 Apr, 26 : 02:21 PM

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना मातृशोक

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन झालं आहे. सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक कर्तव्यावर असलेले तुकाराम मुंडे तातडीने पुण्याला रवाना झाले असून, रात्री ९ वाजेपर्यंत ते पोहोचतील. त्यानंतर आईचं पार्थिव आज रात्री ९ वाजता पुण्याहून बीडमधील ताडसोन्ना या गावी नेलं जाईल आणि शुक्रवारी सकाळी गावातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

02 Apr, 26 : 01:54 PM

अमित शाह कडाडले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या आधी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत सत्ताधारी टीएमसी (TMC) आणि मुख्य विरोधी पक्ष भाजपा यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शुभेंदु अधिकारी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने नंदीग्राममध्ये पोहोचलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत मोठी घोषणा केली आहे. १५ दिवस आपण पश्चिम बंगालमध्येच राहून निवडणुकीची धुरा सांभाळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. वाचा सविस्तर

02 Apr, 26 : 12:42 PM

लैंगिक शोषण प्रकरणातील आऱोपी अशोक खरात याला ७ दिवसांची पोलीस कोठडी

लैंगिक शोषण प्रकरणातील आऱोपी अशोक खरात याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अशोक खरातचा ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीतच मुक्काम राहणार आहे.

02 Apr, 26 : 12:33 PM

खरातने पुण्यात मुलीच्या नावे १ कोटी ३० लाखांचा घेतला फ्लॅट

भोंदू अशोक खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू एसआयटीने तपासात उघड केले असून, फक्त भक्तांकडूनच तो रोखीने व्यवहार करीत नव्हता तर कोट्यवधीचे व्यवहारही त्याने कॅश नेटवर्कद्वारे उभे केल्याचं उघड झालं आहे. पुण्यात मुलीच्या नावे खरातने खरेदी केलेला एक कोटी तीस लाख रुपयांचा फ्लॅट रोख स्वरुपात घेतला होता, ही बाब तपासात उघड झाली आहे. वाचा सविस्तर

02 Apr, 26 : 12:17 PM

खरात प्रकरणाची सुनावणी व्हिसीद्वारे...


नाशिक: भोंदू अशोक खरात प्रकरणी आज व्हिसीद्वारे सुनावणी सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तपास यंत्रणेने न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणीचा तसा अर्ज सादर केला होता. न्यायालयाने अर्ज मंजूर करून व्हीसीद्वारे सुनावणीची परवानगी दिली. खरात याला आता दुसऱ्या एका गुन्ह्यात दाखल करण्यात आलं असून पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. एसआयटीने त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवलेली आहे.

02 Apr, 26 : 11:32 AM

सुरक्षिततेच्या कारणास्तव भोंदू अशोक खरातची सुनावणी VC द्वारे?

भोंदू अशोक खरातला सुरक्षिततेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.  त्याला आज पाचव्यांदा न्यायालयासमोर (VC च्या माध्यमाने) हजर करण्यात येणार आहे. त्याचा ताबा आणखी एका गुन्ह्यासाठी एसआयटीने घेतला आहे. पोलीस कोठडी मागण्यासाठी त्याला आज न्यायालयासमोर VC च्या माध्यमाने हजर करण्यात येऊ शकते. 


 

02 Apr, 26 : 11:10 AM

२४ तासांत वारा, गारपीट, पाऊस अन् वादळ...

पुढच्या २४ तासांमध्ये नागपुरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळीसह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर इथंही पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

02 Apr, 26 : 11:03 AM

इंडोनेशिया हादरलं! ७.४ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप

इंडोनेशियामध्ये आज पहाटे निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. उत्तर मोलुक्का समुद्रात ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला असून, त्याचे धक्के इतके जोरात होते की झोपेत असलेले नागरिक जीवाच्या आकांताने घराबाहेर पळाले. या भूकंपानंतर समुद्रात सुनामीच्या लाटा उसळल्या असून, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रशासनाने किनारी भागात हाय अलर्ट जारी केला असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

02 Apr, 26 : 11:01 AM

Unseasonal rain: १ लाख १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

राज्यात मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे २८ जिल्ह्यांतील तब्बल सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील काढणीला आलेल्या रब्बी तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाले आहे. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, याबाबतचा अहवाल लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. 

वाचा सविस्तर

02 Apr, 26 : 11:01 AM

"ही आमची लढाई नाही...!"; ट्रम्प यांच्या आवाहनावर पाश्चात्य देश स्पष्टच बोलले


'फायनान्शियल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यपूर्वेला जोडला जाणारा स्ट्रॅट ऑफ होर्मुझ हा महत्वाचा जलमार्ग पुन्हा खुला करण्यासाठी अमेरिकेला मदत करावी, असे आवाहन ट्रम्प यांनी पाश्चात्य देशांना केले होते. मात्र, फ्रान्स, स्पेन आणि इटली यांसारख्या देशांनी अमेरिकेला आपली लष्करी तळे वापरण्यास नकार दिला. तसेच, "ही आमची लढाई नाही," म्हणत, होर्मुझ सामुद्रधुनी खुला करण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या जागतिक आघाडीत सहभागी होण्यासही या देशांनी नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प संतापले आहेत. सविस्तर वाचा

02 Apr, 26 : 10:58 AM

अमेरिका-इराण युद्धात 'बळीचा बकरा' बनणार युक्रेन? ट्रम्प यांची मोठी धमकी

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युरोपीय देशांनी अपेक्षित सहकार्य न केल्याने ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. मात्र यात 'बळीचा बकरा' बनू शकतो तो, गेल्या चार वर्षांपासून रशिसोबत युद्ध लढत असलेला युक्रेन. कारण आता ट्र्म्प यांनी युक्रेनला थेट शस्त्रास्त्र पुरवठा बंद करण्याचीच धमकी दिली आहे. सविस्तर वाचा

02 Apr, 26 : 10:41 AM

युद्ध आणखी भडकणार! ट्रम्प यांनी इशारा देताच, इराणनं इस्रायलवर डागलं मिसाइल!

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पुढे काय होणार, या विवंचनेत जगभरातील देश असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला संबोधित केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. परंतु, ट्रम्प यांचे संबोधन संपताच इराणने इस्रायलवर जोरदार हल्ले चढवले. त्यामुळे युद्धाची स्थिती आणखीन चिघळण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. सविस्तर वाचा

02 Apr, 26 : 10:31 AM

"ज्यांना होर्मुझची गरज, त्यांनी तिचे संरक्षण करावे, आम्हाला गरज नाही" - ट्रम्प

अमेरिकेने इस्रायलच्या साथीने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. युद्ध सुरू होऊन एक महिना उलटून गेला आहे. इराणही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना आणि धमक्यांनाही चोख उत्तर देत आहे. यातच आज ट्रम्प यांनी देशाला संबोधित करताना आपल्या 'प्राइम-टाइम' भाषणातून युद्धासंदर्भात ताजी माहिती दिली. दरण्यान ट्रम्प म्हणाले, "आम्हाला होर्मुझ मार्गाची काहीही गरज नाही. ज्या देशांना याची गरज आहे. त्यांनी याचे संरक्षण करायला हवे. व्हेनेझुएलातील तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांचा विकासासंदर्भात आणि ते विकण्यासंदर्भात एकत्रितपणे काम केले जात आहे. आता अमेरिका मध्य-पूर्वेतील ऊर्जेवर अवलंबून नाही. वाचा सविस्तर

02 Apr, 26 : 10:22 AM

"होर्मुझ खुला केला नाही तर अणुकेंद्रांवर हल्ले चढवू"; ट्रम्प यांची इराणला धमकी

भारतीय वेळेप्रमाणे गुरुवारी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी हे २० मिनिटांचे संबोधन केले. यावेळी त्यांनी जनतेला युद्धासंदर्भात माहिती दिली आणि इराणलाही थेट इशारा दिला. इराणने होर्मूझची समुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर त्याच्या अणुकेंद्रांवर थेट हल्ले चढवले जातील अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. पडद्याआड कुटनितिक चर्चा सुरू असली तरी, आगामी दोन-तीन आठवड्यांत आपण इराणवर अत्यंत घातक हल्ले चढवणार आहोत. वाचा सविस्तर

 

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 2 April 2026: US Israel Iran War, Donald Trump, Ashok Kharat Crime case inquiry, IPL 2026, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, LPG Crisis, Rain in Maharashtra