शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

Maharashtra HSC 12th Result 2021: बारावीचा 'विक्रमी' निकाल जाहीर; ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 2:18 PM

Maharashtra HSC 12th Result 2021, MSBSHSE Board HSC 12th Result 2021 इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे.

पुणे : Maharashtra HSC 12th Result 2021 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.3) जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के वाणिज्य शाखेचा 99 .91 टक्के तर कला शाखेचा 99.83 लागला.शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 46 तर 12  विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहे. कोकणचा सर्वाधिक 99.81 टक्के आणि औरंगाबाद 99.34 टक्के सर्वात कमी असा निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात ८.९७ टक्के वाढ झाली आहे. Maharashtra HSC 12th Result 2021, MSBSHSE Board HSC 12th Result 2021 

दहावीच्या निकालाप्रमाणे बारावीच्या निकालात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी पाच संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे दहावी,अकरावी आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी 13 लाख 17 हजार 76 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही.या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारसाठी एक संधी उपलब्ध राहिल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

निकाल पाहण्यासााठी संकेतस्थळ

1) https://hscresult.11thadmission.org.in2) https://msbshse.co.in3) hscresult.mkcl.org4) mahresult.nic.in.5) http://lokmat.news18.com

बारावी निकालावर आक्षेप नोंदवता येणारराज्य मंडळाकडून मंगळवारी जाहीर केल्या जाणा-या इयत्ता बारावी निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रार नोंदवता येणार असून विभागीय मंडळ स्थरावरून संबंधित तक्रारींचे निराकर केले जाणार आहे,असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रसिध्द केल्या जाणा-या बारावीच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला.परीक्षेचा निकाल सुधारित मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार जाहीर झाल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्यांच्या निराकरणासाठी विभागीय मंडळ स्थरावर व्यवस्था निर्माण काण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक विभागीय मंडळ स्थरावर तक्रार निवारण करण्यासाठी अधिका-यांची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहसचिव प्रिया शिंदे पुणे विभागातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण करणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्रcollegeमहाविद्यालय