शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Maharashtra Government: संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:14 AM

Maharashtra News : गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. 

मुंबईः राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार असून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसावं, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्या गळ्यातही मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव अगत्यानं घेतलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना छेडलं असता, त्यांनी मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच व्हावं, यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. तसेच शिवसैनिकांचीही तीच इच्छा असल्याचं सांगत त्यांनी विषयाला बगल दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’मध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली असता, मुख्यमंत्री संजय राऊतांना करावं, अशी इच्छा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत अचानक संजय राऊत यांचं नाव आघाडीवर आलं आहे. संजय राऊत यांनी भाजपाला अंगावर घेत शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली होती. भाजपाच्या दबावाला न झुकता संजय राऊतांनी त्यांच्यावर वेळोवेळी निशाणा साधला. त्यामुळेच संजय राऊत यांना बक्षिसाच्या स्वरूपात मुख्यमंत्रिपद मिळण्याची एक अटकळ बांधली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना सत्ता स्थापन करेल, अशी आग्रही भूमिका नेहमीच संजय राऊत मांडत आले आहेत.शिवसेनेकडे 170 आमदारांचं पाठबळ असल्याचंही त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत शिवसैनिकालाच बसवणार असल्याचंही त्यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार असून, तेच सरकारचा योग्य चेहरा ठरू शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असल्यास आम्ही पाठिंबा देणार आहोत, तसेच राज्यातला सत्ता संघर्ष संपलेला असून, दोन दिवसांत राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत.दरम्यान, आज होणाऱ्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रमासंदर्भात आमदारांना कल्पना देणार आहेत. महाविकासआघाडी शनिवार 23 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजभवनात भेटीची वेळ घेण्यात येईल. येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार