शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रात अशांनाच मतदान करा जे..."; मुख्यमत्री शिंदे यांचं नाव घेत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:39 IST

Maharashtra Assembly Election 2024 : ...यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताचे आम्हाला दु:ख आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आमचे दु:ख दूर होणार नाही," असे विधानही त्यांनी केले होते.

आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकांवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात हिंदूंच्या हितासाठी काम करणाऱ्यांनाच मत द्यायला हवे. यावेळी, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य करत आहेत, त्यांनी गायीला 'राजमाते'चा दर्जा दिला आहे, असेही म्हटले आहे.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यापूर्वीही एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या विश्वासघाताचे आम्हाला दु:ख आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आमचे दु:ख दूर होणार नाही," असे विधानही त्यांनी केले होते.

काम करणाऱ्यांना समर्थन - उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका कार्यक्रमातही दिसले आणि त्यांचे कौतुकही केले होते. नुकतेच एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत बोलताना, महाराष्ट्र हे देशातील असे पहिले राज्य आहे, ज्याने गायीला राज्य मातेचा दर्जा दिला. यामुळे विद्यमान शिंदे सरकारला विधानसभा निवडणुकीत विजयासाठी आशीर्वाद देत आहोत. याच वेळी, त्यांनी असेही स्पष्ट केले होते की, ज्या पक्षाकडून गायीच्या संरक्षणाचा विचार केला जाईल, त्यांना आपण समर्थन देणार. आपण कुण्या एखाद्या विशिष्ट पक्षाचे समर्थन करत नाही. तर ज्या पक्षाचे कार्य श्रेष्ठ असते, त्यांनाच समर्थन देतो.

निवडणुकीपूर्वी, एक मोठा निर्णय घेत सप्टेंबर महिन्यात एकनाथ शिंदे सरकारने गायीला राज्य मातेचा दर्जा देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेElectionनिवडणूक 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरे