शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Opinion Poll: महायुतीचं 'द्विशतक' हुकणार, पण सत्ता टिकणार; महाआघाडीची दांडी उडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 6:17 PM

राज्याच्या कौल महायुतीला; महाआघाडीची घसरगुंडी

मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर सोमवारी राज्यात  मतदान होईल. यामध्ये महाराष्ट्राची जनता महायुतीच्या बाजूनं कौल देईल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. महायुतीमधील भाजपाची कामगिरी या निवडणुकीत आणखी सुधारेल आणि त्यांना १३४ जागांवर यश मिळेल, असा अंदाज आहे. तर शिवसेनेचे उमेदवार ६० जागांवर विजयी होऊ शकतात. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही राज्यात महाआघाडीला ९० चा आकडा गाठण्यातदेखील अपयश येईल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या होत्या. त्या जागा यंदा १३४ वर जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपा यंदा १६४ जागा लढवत आहे. मागील निवडणुकीत ६३ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला यंदा ६० जागा मिळू शकतात. महायुती जवळपास द्विशतकाजवळ जात असताना महाआघाडी जेमतेम ८६ पर्यंत पोहोचताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत ४२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ४४ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर २०१४ मध्ये ४१ जागांवर विजयी ठरलेली राष्ट्रवादी यंदा ४२ जागा जिंकू शकते. विशेष म्हणजे मुंबईसह सर्वच भागांमध्ये महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे. एकटा मराठवाडा सोडल्यास इतर सर्वच भागांमध्ये महायुतीला नेत्रदीपक यश मिळू शकतं असा अंदाज आहे. मराठवाड्यात महायुती आणि महाआघाडी काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. मात्र तरीही महायुतीलाच जास्त जागा मिळतील, अशी शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे-कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठा विजय मिळू शकतो, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. 

विभागनिहाय कुठल्या पक्षाला किती जागा?मुंबई - (एकूण जागा ३६) - महायुती - ३२ महाआघाडी - ४

ठाणे-कोकण - (एकूण जागा ३९) महायुती - ३४ महाआघाडी - ४ इतर - १

मराठवाडा (एकूण जागा ४६)महायुती - २४ महाआघाडी - २० इतर - २

उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा ३५)महायुती - २१महाआघाडी - १३ इतर- १

विदर्भ (एकूण जागा ६२)महायुती - ४० महाआघाडी - १९ इतर - ३

प महाराष्ट्र - (एकूण जागा ७०)महायुती - ४३ महाआघाडी - २६ इतर - १

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस