शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. 

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडींची मालिका सुरू झाली होती. तेव्हापासून मागच्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडल्या आहे. बदललेली राजकीय समीकरणं, फोडाफोडी यामुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, असं सातत्याने म्हटलं जातंय. दरम्यान, राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली आहे. 

राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? असा प्रश्न आज एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, ''शरद पवार , कारण याची सुरुवात त्यांनी १९७८ मध्ये केली नसती तर हा उद्योग कुणाला सुचला नसता. जे १९७८ मध्ये त्यांनी केलं. १९९२ मध्ये त्यांनी केलं. नारायण राणेंच्या वेळी त्यांनी केलं. नारायण राणे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते. ते बाहेर पडल्यावर शरद पवार यांनी हात वर केले. म्हणून ते काँग्रेसमध्ये गेले, असं खुद्द शरद पवार यांनी सांगितलंय'', असा दावा राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना तुम्ही विचारा की, तुमचं जर चार भिंतींच्या आड काही बोलणं झालं असेल तर ते तेव्हाच का नाही सांगितले. अमित शाह म्हणतात की, मी असं बोललोच नाही. माझा उद्धव ठाकरे आणि अमित शाह दोघांवरही विश्वास नाही. तुम्ही युतीमध्ये होता. एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी बहुमत दिलं. तुमचे सुमारे १६० आमदार निवडून आले. त्यानंतर तुम्ही सांगता की, आता यांनी आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. ते म्हणतात आम्ही असा शब्द दिलेलाच नाही. ज्यावेळी पंतप्रधान तुमच्यासमोर येऊन आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे हे सांगत होते, तेव्हाच तुम्ही आक्षेप का नाही घेतलात. त्याचवेळी अमित शाह यांनी दिलेल्या वचनाची चर्चा का सुरू झाली नाही. ज्यावेळी आमच्याशिवाय सरकार बनू शकत नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना  झाली. त्यावेळी त्यांनी ही चर्चा सुरू केली. याला भूमिका बदलणं म्हणतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMNSमनसे