शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 19:59 IST

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्यात अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्याचं दिसून आले. 

मुंबई - सध्याच्या राजकारणात पक्षांतरं करणे हे काही नवीन राहिले नाही. आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात तर परवा तिसऱ्याच पक्षात असणारे अनेक नेते राजकारणात सापडतील. आयाराम-गयाराम ही संस्कृती राजकारणात ५० वर्षापूर्वीच आली होती. आयाराम गयाराम या म्हणीची सुरुवातच १९६९ मध्ये हरियाणात झाली. जिथे आयाराम नावाचे एक आमदार होते, त्यांनी एका दिवसात २ राजकीय पक्ष बदलले होते. तेव्हापासून आयाराम गयाराम असं राजकारणात बोलू लागले.

लोकमत दिवाळी अंक 'दीपोत्सव' यात राजकीय विश्लेषक योगेद्र यादव लिहितात की, हरयाणाचेच आणखी एक उदाहरण घ्यायचे तर १९८० मध्ये मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या सर्व आमदारांना घेऊन एका रात्रीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता आणि सरकार बदलले होते. तेव्हा आज दिसतात त्या घटना काही अपवाद नाहीत. देशभरात असे अनेक किस्से सांगता येतील. मुद्दा हाच की ज्या घटनांमुळे आपल्याला आज वाटते की राजकारणाने अत्यंत हीन पातळी गाठली आहे तशा घटना देशाच्या इतिहासात आजवर अनेकदा घडल्या आहेत, जुन्याच आहेत असं त्यांनी म्हटलं. 

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरीच राजकीय उलथापालथ राजकारणात घडली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदावरून भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यानंतर अडीच वर्षात ठाकरे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात महायुतीचं सरकार आणलं. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर वर्षभरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली.

अजित पवार यांच्यासह दिग्गज राष्ट्रवादी नेत्यांनी ४० आमदारांसह वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षाचे २ गट तयार झाले. आजच्या घडीला राज्यात ६ प्रमुख पक्ष असून त्यात भाजपा-काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहेत तर शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे गटही रिंगणात आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश घेत आहेत. मात्र राजकारणातील ही आयाराम गयाराम राजकीय संस्कृती फार जुनी आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४