शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना होत्या; शिंदे ऑडिओ क्लिपबद्दल काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:34 IST

नगरविकास खात्याचा मंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होता, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना होत्या. चौकशीनंतर सगळं समोर येईल, असे एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महायुती सरकारने उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांची एसआयटी समिती नियुक्त केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एकनाथ शिंदे म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि माझ्याबद्दल खोट्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कुणाच्या होत्या? काय होत्या? याबाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती. त्यामुळे त्यावर एसआयटी नेमणूक करण्यात आली. एसआयटी स्थापन झालेली आहे. एसआयटीचा अहवाल येईल आणि सविस्तर माहिती मिळेल.

प्रविण दरेकरांचा नेमका आरोप काय?

'वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकावण्याचा प्रयत्न झाला होता. फार मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं. याचसंदर्भात मला तपशीलवार माहिती मिळाली. विविध वाहिन्यांच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन झाले होते, ती माहिती. मी नागपूरच्या अधिवेशनात हा विषय उपस्थित केला होता', असे  प्रवीण दरेकरांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. 

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सह आयुक्त सत्यनारायण चौधरी (कायदा आणि सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त ढवळे, एक पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी या प्रकरणाचा तपास करणार आहे. 

अबू आझमींच्या विधानावरही शिंदे संतापले

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. 

एकनाथ शिंदे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून... त्यांना ४० दिवस छळ करून ज्यांनी मारलं, त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं अतिशय दुर्दैवी आहे. जितका निषेध करू तितका कमीच आहे. खरं म्हणजे अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे", अशी मागणी शिंदेंनी केली. 

"औरंगजेब चांगला प्रशासक होता. त्याचं कौतुक करणं, हे तर महापाप आहे. म्हणून अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे", अशी मागणीही एकनाथ शिंदेंनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस