Sharad Zore : डोंबाऱ्याचा खेळाने बदलला दृष्टीकोन; ‘माणूस प्रतिष्ठान’चे शरद झरे आहेत ६५ अनाथ मुलांचे 'बाबा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:45 IST2026-02-19T18:43:13+5:302026-02-19T18:45:50+5:30

Sharad Zore : शरद झरे यांनी वंचित समाजातल्या मुलांना एकत्र करून त्यांना शाळेकडे, शिक्षणाकडे वळवण्याच्या प्रयत्नांचा अविश्वसनीय प्रवास सुरू केला.

Lokmat Maharashtrian of the Year Award Sharad Zore manus pratishthan helping orphan child | Sharad Zore : डोंबाऱ्याचा खेळाने बदलला दृष्टीकोन; ‘माणूस प्रतिष्ठान’चे शरद झरे आहेत ६५ अनाथ मुलांचे 'बाबा'

Sharad Zore : डोंबाऱ्याचा खेळाने बदलला दृष्टीकोन; ‘माणूस प्रतिष्ठान’चे शरद झरे आहेत ६५ अनाथ मुलांचे 'बाबा'

राजकारण, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येतं. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. लोकसेवा-समाजसेवा या कॅटेगरीमध्ये लातूरच्या शरद झरे यांची निवड करण्यात आली आहे.

शरद झरे यांनी वंचित समाजातल्या मुलांना एकत्र करून त्यांना शाळेकडे, शिक्षणाकडे वळवण्याच्या प्रयत्नांचा अविश्वसनीय प्रवास सुरू केला. ‘माणूस प्रतिष्ठान’ची स्थापना करून शरद झरे यांनी स्वखर्चाने प्रकल्प सुरू केला. कुटुंबाचा आधार हरपलेल्या तीन मुलांना सोबत घेऊन त्यांनी एका झोपडीत निवारा उभारला. बीड जिल्ह्यातील वाणटाकळीच्या डोंगरावर सुरू झालेला प्रवास लातूर जिल्ह्यातील काटगाव आणि आता बुधोडा गावात स्थिरावला आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

२०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक सुरू होतं. जगातले अनेक देश पदकांवर पदकं जिंकत होते. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या, विद्वत्तेच्या दृष्टीने श्रीमंत देशाच्या हाती काही लागेना म्हणून देश अस्वस्थ होता. त्याच दिवसात पुण्यात सारस बागेजवळ चाललेला डोंबाऱ्याचा खेळ पाहत शरद झरे उभे होते. समोर उभारलेल्या दोन उंच काठ्या. त्यावर बांधलेल्या हिंदकळत्या दोरीवर एक चिमुरडी ढोलकीच्या तालावर, आपला तोल सावरत रुबाबात चालत होती. 

वंचित समाजातली मुलं खेळाच्या मैदानावर चमकायला हवीत

शरद झरे त्या मुलीकडे पाहतच राहिले. दोरीवर तोल सावरत चालणं हे असं कौशल्य आहे, जे कुठलाही ट्रेनर शिकवू शकत नाही, ते आपलं आपल्यालाच शिकावं लागतं. ही अशी गुणी, पण वंचित समाजातली लहान मुलं खेळाच्या मैदानावर चमकायला तर हवीतच, पण ती शिकायलाही हवीत, या भावनेने त्यांच्या मनाचा कब्जा घेतला... आणि सुरू झाला एक विलक्षण प्रवास. 

‘माणूस प्रतिष्ठान’ची स्थापना 

वंचित समाजातल्या मुलांना एकत्र करून त्यांना शाळेकडे, शिक्षणाकडे वळवण्याच्या प्रयत्नांचा प्रवास. ‘माणूस प्रतिष्ठान’ची स्थापना करून शरद झरे यांनी स्वखर्चाने प्रकल्प सुरू केला. कुटुंबाचा आधार हरपलेल्या तीन मुलांना सोबत घेऊन त्यांनी एका झोपडीत निवारा उभारला. बीड जिल्ह्यातील वाणटाकळीच्या डोंगरावर सुरू झालेला प्रवास लातूर जिल्ह्यातील काटगाव आणि आता बुधोडा गावात स्थिरावला आहे.

मुलांच्या चौफेर विकासाचा प्रकल्प 

पहिलीपासून दहाव्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या २१ मुली आणि ४४ मुलांचे शरद झरे आणि त्यांच्या पत्नी संगीता झरे हे आई-बाबा आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, डोंबारी, घिसाडी, मसनजोगी, पारधी, भिल्ल आणि स्थलांतरित कामगारांची मुलं, ज्यांचं शिक्षण थांबलं आहे, अशांना झरे यांनी केवळ आसरा दिला नाही, तर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करीत मुलांच्या चौफेर विकासाचा प्रकल्प साकारला आहे.

लोकसेवा-समाजसेवा कॅटेगरीतील नामांकनं पाहण्यासाठी आणि मत देण्यासाठी इथे क्लिक करा.

Web Title : डोम्बारी के खेल ने बदली सोच; शरद झरे बने 65 अनाथ बच्चों के 'पिता'

Web Summary : डोम्बारी कलाकार से प्रेरित होकर, शरद झरे ने 'मानस प्रतिष्ठान' की स्थापना की, जो हाशिए के समुदायों के 65 अनाथ बच्चों को आश्रय और शिक्षा प्रदान करता है। झरे के निस्वार्थ कार्य ने उन्हें 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्कार के लिए नामांकन दिलाया।

Web Title : Dombari's Show Inspires Man to Father 65 Orphaned Children

Web Summary : Inspired by a Dombari performer, Sharad Zare founded 'Manas Pratishthan', providing shelter and education to 65 orphaned children from marginalized communities. Zare's selfless work earned him a nomination for the 'Lokmat Maharashtrian of the Year' award.