शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 10:07 IST

Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांना यावेळी पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट उत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीने राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घडवेन अन् दिल्लीला जाईन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याचं सांगितलं आहे.  इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

उद्धव ठाकरे यांना यावेळी पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट उत्तर दिलं आहे. "मी असं का करू? माझा एकापेक्षा जास्त वेळा विश्वासघात झाला आहे. माझ्या दृष्टीने भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे" असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच "आमचं हिंदुत्व त्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे. आमचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणार आहे. भाजपाचं हिंदुत्व हे घर जाळणारं आहे."

"आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. फक्त देशद्रोही म्हणजेच देशाशी गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधात आहोत. भाजपा म्हणते चार जाती आहेत - तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब. तरुणांना नोकऱ्या कुठे आहेत? शेतकऱ्याच्या म्हणण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. गृहमंत्री या नात्याने अमित शाह यांना मणिपूरमधील महिलांवरील गुन्ह्यांची माहितीच नव्हती, असे दिसते. तुम्ही गरिबांना गरिबीत ठेवता" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. 

"मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि शिवसेना-भाजपाचा अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होईल, यावर अमित शाह यांच्यासोबत एकमत झालेलं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेन आणि नंतर दिल्लीला जाऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मला आज भाजपाचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंदी आहे?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेना