शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Lockdown: राज्यात लवकरच लॉकडाउन; लोकांना त्रास होऊ नये, यासाठी तयारी सुरू - राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 21:12 IST

लॉकडाउन काळात गरीब जनतेला त्रास होऊ नये, यासाठीही सरकार उपाय-योजना करत आहे. असेही टोपे यावेळी म्हणाले.

मुंबई - देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाउनची चर्चा सुरू असतानाच, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी, राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लवकरच लॉकडाउन लावला जाईल आणि त्याची तयारी सुरू आहे. लॉकडाउनवर अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे म्हटले आहे. ते मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. (Lockdown in the state soon Preparations are underway for people not to be bothered says Rajesh Tope)

लॉकडाउन काळात गरीब जनतेला त्रास होऊ नये, यासाठीही सरकार उपाय-योजना करत आहे. असेही टोपे यावेळी म्हणाले. तसेच 10वी आणि 12वीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लॉकडाउनच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. भाजपसह काही इतर पक्ष राज्यात संपूर्ण लॉकडाउनला विरोध करत आहेत. 

Coronavirus Lockdown News : फक्त लॉकडाउनच पर्याय? पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांनंतर आता राज्यपालांसोबत बैठक

मुंबईत कोविड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंतकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणखी क्षमता वाढवण्याचे काम राज्यात सुरू आहे. मुंबईत कोव्हिड सेंटरची क्षमता दहा हजार रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. त्यात आता दोन नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. तसेच कोव्हिड सेंटरमध्येही नोडल अधिकारी असणार आहे. आताच्या घडीला नियम तयार करण्यात आलेले आहेत, ते लागू आहेत. सरकार व सरकारमधील सर्व मंत्री एकत्रितपणे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतील, असे नवाब मलिक म्हणाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, व्हॅक्सीन सप्लायसह केल्या 'या' तीन मागण्या

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत व्यक्त केले आहे. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे