Coronavirus in india PM Narendra Modi will meeting with governors of states On the background of the Coronavirus | Coronavirus Lockdown News : फक्त लॉकडाउनच पर्याय? पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांनंतर आता राज्यपालांसोबत बैठक

Coronavirus Lockdown News : फक्त लॉकडाउनच पर्याय? पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांनंतर आता राज्यपालांसोबत बैठक

ठळक मुद्देकेंद्रशासित प्रदेशांतील उपराज्यपालही या बैठकीत सहभागी होणार आहेत.14 एप्रिलला सायंकाळी 6.30 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेही राज्यपालांसोबतच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली - संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशातील सर्व राज्यपालांसोबत बैठक करणार आहेत. केंद्रशासित प्रदेशांतील उपराज्यपालही या बैठकीत सहभागी होणार आहेत. 14 एप्रिलला सायंकाळी 6.30 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेही राज्यपालांसोबतच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोरोना परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होईल. (Coronavirus in india PM Narendra Modi will meeting with governors of states On the background of the Coronavirus)

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

यापूर्वी पंतप्रधान मोदींनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली होती. मात्र, यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाउनला नकार दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. येथे कोरोना स्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निश्चितपणे लॉकडाउन होणार, असे मानले जात आहे. 

70 टक्के कोरोनाबाधित केवळ 5 राज्यांत -
गेल्या 24 तासांत देशात आतापर्यंतचे सर्वाधिक 1.70 लाख कोरोनाबाधित समोर आले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीतही कोरोनाचे आतापर्यंतचे जवळपास सर्वच विक्रम मागे पडले आहेत. 70 टक्क्यांहून अधिक कोरोना रुग्ण केवळ 5 राज्यांतूनच समोर आले आहेत. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळचा समावेश आहे. आता विधानसभा निवडणूक सुरू असलेल्या पश्चिम बंगालमध्येही कोरोना रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे.

Coronavirus: राजकारणामुळे सरकारचं कोरोना प्रतिबंधांकडे दुर्लक्ष, 'या' जिल्ह्यातील लोकांनी स्वतःच लावला लॉकडाउन

...तर राज्यात (महाराष्ट्रात) मृत्यूंचा खच पडेल - 
कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊनबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचार करत आहेत. मात्र मला दोन आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा वाटतो. एवढेच नाही, तर राज्यात कडक लॉकडाऊन केला नाही आणि लोक भीती न बाळगता घराबाहेर पडतच राहिले तर राज्यात मृत्यूंचा खच पडेल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. रविवारी राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. रविवारी महाराष्ट्रात 63 हजार 294 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. राज्यात आतापर्यंत 34 लाख 07 हजार 245 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus in india PM Narendra Modi will meeting with governors of states On the background of the Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.