शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक पातळीवर भाजपासोबतच!

By admin | Updated: August 13, 2014 02:59 IST

विदर्भात भाजपाशी जिल्हा परिषदांमध्ये असलेली युती आगामी विधानसभा निवडणूक काळातही कायम राहणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़

गडचिरोली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक एकचा शत्रू मानणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसला विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र भाजपाची ‘अ‍ॅलर्जी’ नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे़ विदर्भात भाजपाशी जिल्हा परिषदांमध्ये असलेली युती आगामी विधानसभा निवडणूक काळातही कायम राहणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़ पवार म्हणाले, काँग्रेसनेही कोल्हापूर, उस्मानाबादमध्ये इतर पक्षांशी युती केली आहे. दोन्ही काँग्रेसने मिळून अशा युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीतही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत आघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील युती तुटली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीतही स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजपाशी असलेली युती अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. दरम्यान, गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्थानिक स्तरावरील या आघाड्या तोडणे राष्ट्रवादीला शक्य नाही. दोनतृतीयांश बहुमत लागते, असे सांगत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यावरच यावर विचार करता येईल, असे ते म्हणाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी राहणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याबाबत निर्णय घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.राज्यात निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय पक्ष विविध आंदोलन तापविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत धनगर व आदिवासी यांच्यामध्येही अशाच प्रकारचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे पवार म्हणाले़ (प्रतिनिधी)