शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

होऊ दे चर्चा...

By admin | Updated: October 8, 2014 13:38 IST

‘लक्ष्मी’ मंदिराजवळील अलिशान ‘लोटस्’ महालात नितीनबापू नागपूरकर महाराजांचा दरबार भरलेला. कैक नेते आपापला हात दाखवायला रांगेत उभारलेले. ‘भगव्या’ चोचीचा ‘हिरवा’ पोपट एकेक पत्ते ओपन करू लागलेला.

लक्ष्मीदर्शनाचा प्रसाद.... वहाण पीडा योग !(स्थळ : ‘लक्ष्मी’ मंदिराजवळील अलिशान ‘लोटस्’ महालात नितीनबापू नागपूरकर महाराजांचा दरबार भरलेला. कैक नेते आपापला हात दाखवायला रांगेत उभारलेले. ‘भगव्या’ चोचीचा ‘हिरवा’ पोपट एकेक पत्ते ओपन करू लागलेला.) उद्धो : (मनगटावरचं शिवबंधन मागं सरकवत) महाराजऽऽ माझ्या हातावरच्या रेषा काय म्हणतात? ‘राजयोग’ आहे की नाही?महाराज : (गोबऱ्या-गोबऱ्या गालावरच्या नाजूक खळीत इवलीशी मिशी वक्र करत) अरेऽऽरेऽऽ.. तुमच्या कुंडलीत ‘मोदींचा गुरु’ वक्री झाल्यानं आगामी काळात केवळ ‘संघर्षाचा योग’ आहे. उद्धो : (देवेंद्रपंत अन् एकनाथभाऊंकडं रागानं पाहात) मला ‘वक्री गुरु’चं भय नाही; मात्र खालच्या ‘राहू-केतू’च्या लुडबुडीचा राग येतोय. ही बघा माझी नवी कुंडली. कालच बारामतीच्या एका जाणकार ज्योतिषानं तयार करून पाठविलीय. महाराज : (कुंडली पाहून दचकत) आँ? तुमचा ‘सत्तेचा शुक्र’ एकोणीस तारखेनंतर शरद ‘चंद्रा’शी युती करणार असल्याचं कुंडलीत दिसतंय. अशी कशी काय तुमची कुंडली बदलू शकते ?पृथ्वीराज : (डोकं खाजवत) बारामतीचे ज्योतिषबुवा काहीही करू शकतात. ‘सत्तांतर’ अन् ‘पक्षांतर’ यात माहीर असल्यानं ते ‘कुंडल्यांतर’ही करू शकतात.राज : (पानोपानी खाडाखोड केलेल्या ब्लू प्रिंट’ची रद्दी समोर आदळत) महाराजऽऽ ती कुंडली बुडवा उजनी धरणाच्या पाण्यात. अगोदर या रद्दीचं काय करू ते सांगा. महाराज : (डोळे मिचकावत) चिंता नसावी भक्ता. आमचा स्पर्श लाभला तर तुझ्या रद्दीचंही सोनं होईल. फक्त पुढचे सात-आठ दिवस मौन व्रत बाळग... कारण तुझ्या जीभेतली विध्वंसक शक्ती तुलाच मारक ठरू शकतेय.राज : (चरफडत) मग तोपर्यंत काय करू महाराज?महाराज : मराठी व्याकरणाची पुस्तकं वाच. शक्य झालं तर गुजराथी भाषेचाही अभ्यास कर. भविष्यात आमच्याशी ‘सुंसवाद’ साधायला उपयोगी ठरेल. रामदास : (दाढीवरून हात फिरवत नेहमीची ‘ट’ ला ‘ट’वाली कविता म्हणत) तुम्ही ‘लक्ष्मी’पुत्र’तर आम्ही ‘सरस्वती’ची लेकरं..‘राखी’ सोबत असताना, विरोधकांना आणू फेफरं !सदाभाऊ : (‘लक्ष्मी’चं नाव कानावर पडताच लगेच कान टवकारून उत्साहानं) महाराजऽऽ तुम्ही म्हणे ‘लक्ष्मीदर्शन’ देता. मग मला कधी दिसणार?महाराज : (मानभावीपणे हात जोडत) मी तर साधा लक्ष्मीभक्त. मी कोण ‘लक्ष्मीदर्शन’ घडविणारा? मी फक्त ‘लक्ष्मी’च्या आगमनाची जाणीव करून देणारा.उद्धो : (हेटाळणीच्या सुरात) पण गेल्या दोन महिन्यांपासून तुमच्या महालात ‘प्रवेश’ करणारे महाभाग तर ‘लक्ष्मीपुत्र’च आहेत की !महाराज : (तोंडावर बोट ठेवून) भक्तहोऽऽ आता माझ्या मौनव्रताच्या काळाला प्रारंभ होतोय; कारण आजकाल माझा शब्द माझ्यावरच उलटतोय. बहुधा माझेच ग्रह उलटे फिरलेत वाटतं.उद्धो : (खोचकपणे) होय. म्हणूनच की काय , तुमच्या कुंडलीत परवा रात्री पुण्याचा ‘वहाण योग’ होता वाटतं! महाराज : (लगेच सावरून घेत) छे. छे. ‘आपलं वहाण देशभरात गाजलं पाहिजे,’ असं आमच्या ‘सुरत’च्या बड्या महाराजांनी नुकतंच कोल्हापुरात सांगितलं होतं. त्याचाच हा प्रत्यय !- सचिन जवळकोटे