शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात भूमिका मांडू’

By admin | Updated: June 23, 2016 04:54 IST

मराठा आरक्षणाबाबत २८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयात राज्य शासनामार्फत अधिक भक्कमपणे बाजू मांडली जाईल

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत २८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयात राज्य शासनामार्फत अधिक भक्कमपणे बाजू मांडली जाईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.मराठा आरक्षण समितीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. त्यात मराठा आरक्षण समितीचे सदस्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अजित पवार, आमदार विनायक मेटे, राजेंद्र कोंढरे यांच्यासह या विषयाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.तावडे म्हणाले, पुढील आठ दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. या बैठकीला राज्याचे महाधिवक्ता (अ‍ॅडव्होकेट जनरल) यांनाही बोलविण्यात येईल. राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्ग म्हणून मराठा समाजाचा विचार व्हावा, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मराठा समाजाच्या समुदायाला आरक्षण मिळावे आदी मुद्दे या बैठकीत मांडण्यात येतील.२८ जूनपासून उच्च न्यायालयात या विषयाबाबत सुनावणी होणार आहे. राज्य शासनाची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका राज्य शासनामार्फत मांडली जाईल. (विशेष प्रतिनिधी)