शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स २४ तास खुली ठेवू द्या!

By admin | Updated: July 3, 2016 19:14 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ह्यमॉडेल शॉप्स अ‍ॅन्ड एस्टॅब्लिशमेंट्सह्ण विधेयकाची अंमलबजावणी राज्यांतही व्हावी, म्हणून हॉटेल व्यवसायिकांच्या संघटनेने चार राज्यांच्या सरकारला निवेदन दिले आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ३ : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ह्यमॉडेल शॉप्स अ‍ॅन्ड एस्टॅब्लिशमेंट्सह्ण विधेयकाची अंमलबजावणी राज्यांतही व्हावी, म्हणून हॉटेल व्यवसायिकांच्या संघटनेने चार राज्यांच्या सरकारला निवेदन दिले आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील सरकारला दिलेल्या निवेदनात हॉटेल व रेस्टॉरन्ट २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी संघटनेने मागितली आहे.

यासंदर्भात हॉटेल अ‍ॅन्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) या संघटनेचे अध्यक्ष भरत मलकानी म्हणाले की, याआधीच संघटनेने मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरन्ट २४ तास खुली ठेवण्याची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकानंतर ही मागणी प्रत्यक्षात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे व्यवसाय आणि नाईट लाईफ यांची शहरातीलसमीकरणे बदलणार आहेत. कारण यामुळे राज्याच्या महसूलात वाढ होणार असून रोजगाराच्या संधीही वाढतील. रात्रीच्या वेळी रस्त्यावर गर्दी असल्यास महिलांच्या सुरक्षेत आपोआपच वाढ होईल. तरी केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे, की त्यांनीही यामधील सकारात्मक बाजूंचा विचार करून २४ तास हॉटेल व रेस्टॉरन्ट सुरूठेवण्यास मान्यता द्यावी.

संघटनेचे माजी अध्यक्ष कमलेश बरोट म्हणाले, अ‍ॅक्टीव्ह नाईट लाइफचा थेट फायदा पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायाला होतो. ज्याठिकाणी रात्रीसदेखील सर्व आस्थापने चालू असतात, अशा ठिकाणी व्यवसायिक पर्यटक एक किंवा दोन रात्र जास्तीचा मुक्काम करतात. खासकरून युरोप आणि अमेरिकेमधील पर्यटकांमध्ये दिवसभराच्या कामानंतर थकवा घालवण्यासाठी रात्री पार्टी करण्याची संस्कृती आढळून येते. पर्यटकांनी महाराष्ट्रामध्ये एक रात्र अधिक मुक्काम केल्यास ६०३ कोटींचा अधिक महसूल सरकारला प्राप्त होऊ शकतो.