शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

लिंगाळीला दोन गटांत जबरी मारहाण

By admin | Updated: July 11, 2017 00:44 IST

हॉटेलजवळ झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय माने यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : लिंगाळी (ता. दौंड) परिसरातील एका हॉटेलजवळ झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय माने यांनी दिली. याप्रकरणी परस्पर दोन मारहाणीच्या तक्रार दाखल झाल्या आहेत. जयंत चितळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हटले आहे की, रविवार (दि. २) रोजी माझा पुतण्या संदीप चितळे हा त्याच्या मित्रासोबत लिंगाळी हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. दरम्यान, संदीप यास तुटलेली खुर्ची बसण्यास दिली असता हॉटेल मालकाने दोन खुर्च्यांचे सोळाशे रुपये बिल घेतले होते. रविवार (दि.९) रोजी रात्री मी माझा पुतण्या संदीप आणि रणजित टाक व इतर मित्र या हॉटेलवर मालकाला समजून सांगण्यासाठी गेले आणि मालकाला बाहेर बोलावले. तेव्हा मालक तीन ते चार वेटर आमच्याकडे आले आणि दमदाटीची भाषा बोलू लागले. आणि त्याने आमच्याशी धक्काबुक्की करुन सचिन हगारे व संदीप हगारे व १0 ते १२ लोकांनी रॉड, पाईप, चाकू घेऊन आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि हॉटेलमालकानी त्याच्या हातातील कुऱ्हाड मारली. वेटर लोकांनी लोखंडी पाईपने मारहाण केली. या मारहाणीत मी स्वत: संदीप चितळे आणि रणजित टाक यांना जबर मारहाण झाली. हॉटेल मालक संदीप हगारे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवार (दि.९) रोजी रात्रीच्या वेळेला अचानक हॉटेलमध्ये १0 अनोळखी इसम आले आणि त्यातील एक म्हणाला, आम्हाला दारु प्यायची आहे. आम्ही त्यांना हॉटेलमध्ये दारू पिऊ दिली नाही. यातील एकाने माझ्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तेव्हा माझा भाऊ सचिन हगारे दोघे हॉटेलच्या बाहेर गेलो आणि मोबाईल मागू लागलो. तेव्हा त्याच्यातील काही लोकांनी हातातील लोखंडी कोयत्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली आम्ही त्यांचे वार चुकवले. यावेळी सचिन याच्या हातास कोयता खरचटला आहे. तेव्हा संदीप चितळे, जयंत चितळे, रणजित टाक, भय्या हरदे आणि अन्य काही अज्ञात इसमांनी आम्हास मारहाण केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.