आघाडी केवळ राष्ट्रवादीची जबाबदारी नाही-आर. आर. पाटील

By Admin | Updated: September 4, 2014 00:53 IST2014-09-04T00:53:53+5:302014-09-04T00:53:53+5:30

आघाडीचा निर्णय ही काही एकटय़ा राष्ट्रवादीची जबाबदारी नाही. आम्ही सत्तेला कधी महत्त्वाचे मानलेले नाही. मागील वेळी आमच्या जागा अधिक असतानाही मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले.

Leadership is not only NCP's responsibility - R. R. Patil | आघाडी केवळ राष्ट्रवादीची जबाबदारी नाही-आर. आर. पाटील

आघाडी केवळ राष्ट्रवादीची जबाबदारी नाही-आर. आर. पाटील

पुणो : आघाडीचा निर्णय ही काही एकटय़ा राष्ट्रवादीची जबाबदारी नाही. आम्ही सत्तेला कधी महत्त्वाचे मानलेले नाही. मागील वेळी आमच्या जागा अधिक असतानाही मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले. त्यावेळी काँग्रेसने राज्यात त्यांचे खासदार अधिक असल्याचे कारण पुढे करीत मुख्यमंत्रीपद मागितले होते. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार काँग्रेसपेक्षा अधिक असल्यामुळे मागील वेळच्या नियमाप्रमाणो आमच्या जागांची मागणी काँग्रेसने मान्य करावी, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले. 
पुणो शहर पोलिसांच्या शिवाजीनगर मुख्यालयातील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले की, राज्यामध्ये 144 जागा लढवण्याची मागणी पक्षातील दुस:या फळीतील नेत्यांची आहे. परंतु, पक्षाध्यक्ष शरद पवार जो अंतिम निर्णय घेतील तो सर्वाना मान्य असेल. स्वतंत्र विदर्भ आणि संयुक्त महाराष्ट्राबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. 1 मे मनापासून साजरा न करणा:या या दोघांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा हे नेते करीत आहेत. भाजपाचा छुपा अजेंडा लोकांपासून लपून राहिलेला नाही.
मोदी सरकारचे 1क्क् दिवस हे देशातील जनतेचे 1क्क् टक्के भ्रमनिरास करणारे दिवस ठरले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

 

Web Title: Leadership is not only NCP's responsibility - R. R. Patil