शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील चार जिल्ह्यांत पट्टेदार वाघांचे अस्तित्व

By admin | Updated: June 6, 2015 01:37 IST

जंगलात वास्तव्यास असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी वनविभागाने कृती आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे.

अमरावती : राज्यात वाघोबांची संख्या वाढतेय, ही सुखद घटना आहे. परंतु हे वाघ अतिसंरक्षित क्षेत्राबाहेर म्हणजे जंगलात वास्तव्यास असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी वनविभागाने कृती आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे. चार जिल्'ांत जंगलात पट्टेदार वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे.प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी मुख्य वनसंरक्षकांना पाठविलेल्या पत्रात नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, कळमेश्वर, अमरावतीचे पोहरा-मालखेड, जळगाव जिल्'ातील मुक्ताईनगर तसेच धुळे येथील शिरपूर या राखीव जंगलात पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याचे म्हटले आहे. वाघांचे संरक्षण आणि संगोपन व्याघ्र प्रकल्पात होणे अपेक्षित आहे. मात्र, या जिल्ह्यांतील जंगलात वाघ आढळल्याच्या नोंदी वनविभागात केल्या आहेत. जंगलात पट्टेदार वाघ असणाऱ्या परिसरात गस्त वाढविणे, ट्रॅप कॅमेरे बसविणे, रेस्क्यू आॅपरेशनची चमू तैनात ठेवणे आदी उपाययोजना करण्याचे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)वाघोबांचा नवीन क्षेत्रात घरोबाच्व्याघ्र प्रकल्पांच्या अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांचे संगोपन आणि संरक्षण होणे आवश्यक आहे. परंतु काही वर्षांपासून वाघांनी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वास्तव्याचे क्षेत्र शोधून काढले आहे. च्अतिसंरक्षित क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या वाघोबांनी ५० ते ६० कि.मी.चा प्रवास करुन खुल्या जंगलात नवीन घरोबा तयार केल्याने वनविभागाची जबाबदारी वाढली आहे. च्अधिक जबाबदारी आली आहे. नागपूर येथे ताडोबा, पेंच, अमरावतीत बोर, नागझिरा तर जळगाव येथे मेळघाट, धुळे येथे नाशिक या भागातून पट्टेदार वाघ आल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.पोहरा- मालखेड या जंगलात यापूर्वी पट्टेदार वाघ आढळल्याची नोंद आहे. हा वाघ वर्धा जिल्ह्यातील बोर, नागझिरा येथून आल्याचा अंदाज आहे. वाघांचे मॉनिटरिंग करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. परंतु काही दिवसांपासून ट्रॅप कॅमेऱ्यात या वाघाचे लोकेशन मिळाले नाही. तरीदेखील अधिकारी, कर्मचारी पट्टेदार वाघांच्या संरक्षणासाठी तैनात आहेत.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.अशी करा उपाययोजनाराखीव व खुल्या जंगलात पट्टेदार वाघ असल्याबाबत वनविभागाने शिक्कामोर्तब केला असला तरी या वाघांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यात वाघांचे दैनंदिन मॉनिटरिंग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅपिंग, जनजागृती, शिकार प्रतिबंधक पथकाची नियुक्ती, वाघांची शिकार व दुर्घटनेवर लक्ष आदी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. या वाघांच्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिल्या आहेत.