मराठी भाषिकांवर लाठीमार

By Admin | Updated: July 28, 2014 04:25 IST2014-07-28T04:25:21+5:302014-07-28T04:25:21+5:30

येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला

Lathmar on Marathi speakers | मराठी भाषिकांवर लाठीमार

मराठी भाषिकांवर लाठीमार

बेळगाव : येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून मर्दुमकी गाजविली. पाठोपाठ येळ्ळूर गावात शिरून पोलिसांनी गावातील प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला.
घरातील वस्तूंची तोडफोड करून अनेकांना बेदम मारहाण केली, तर अनेक वाहनांचेही पोलिसांनीच नुकसान केले. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. पोलिसांचा हा धुडगूस येळ्ळूरमध्ये सुमारे अर्धा तास सुरू होता. येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक काढण्यात आला होता.

Web Title: Lathmar on Marathi speakers