शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाची डी. लिट

By admin | Updated: February 6, 2017 17:14 IST

नकोकिळा लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाच्या वतीने डी. लिट या सन्माननीय पदवीने सन्मानित करण्यात येणार

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 6 - गानकोकिळा लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठाच्या वतीने डी. लिट या सन्माननीय पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्याचे औचित्य साधून मंगेशकर यांना डी. लिट पदवी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत राज्यपालांच्या हस्ते एका विशेष समारंभात लवकरच त्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.मुक्त विद्यापीठाचा २३ वा पदवीप्रदान सोहळा मंगळवार, दि. ७ रोजी सायंकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. या समारंभात १ लाख ४० हजार ४८४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून लता मंगेशकर यांना डी.लिट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाने मंगेशकर यांच्याशी संपर्क साधून पदवीप्रदान सोहळ्यातच डी.लिट प्रदान करण्याची इच्छा प्रगट केली होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगेशकर नाशिकला येऊ शकत नसल्याने मुंबईत एका विशेष समारंभात त्यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.विद्यापीठाने २०११ मध्ये गानसम्राज्ञी आशा भोसले यांना डी.लिट पदवी देऊन गौरव केला आहे. विद्यापीठाने सचिन तेंडुलकर यांच्या नावाचीही तत्पूर्वी घोषणा केली होती. परंतु सचिनने नम्रपणे नकार दिल्यानंतर आशा भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आले. आता सहा वर्षांनंतर डी.लिट पदवीने लता मंगेशकर यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी विद्यापीठाने वि. वा. शिरवाडकर, शांताबाई दाणी, बाबा आढाव यांना डी.लिट उपाधीने सन्मानित केले आहे.