शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात

By admin | Updated: August 19, 2014 23:37 IST

गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांत येऊन ठेपला आहे. गणोश चित्रशाळांमध्येही मूर्तिकारांची लगबग सुरु झाली असून मूर्तीचे रंगकाम सुरु झाले आहे.

पनवेल : गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांत येऊन ठेपला आहे. गणोश चित्रशाळांमध्येही मूर्तिकारांची लगबग सुरु झाली असून मूर्तीचे रंगकाम सुरु झाले आहे. वाढत्या महागाईचा फटका दरवर्षीप्रमाणो यंदाही गणोश मूर्तिकारांना बसला असून मूर्तीच्या किमतीत सुमारे 2क् टक्के वाढ झाली आहे, असे असतानाही गणोशभक्त आवजरून गणरायांची स्थापना करण्यासाठी वेगवेगळय़ा कला केंद्रात मनासारखी मूर्ती खरेदी करण्यासाठी फिरताना दिसत आहेत.
29 ऑगस्टपासून गणोशोत्सवाला सुरुवात होत आहे. अवघा आठवडाभराचा कालावधी उरला असल्याने मूर्तिकारांची लगबग सुरु झाली आहे. मूर्तीचे मातीकाम पूर्ण होऊन रंगकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच गणोश चित्रशाळांमध्ये गणराज रंगल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या महागाईचा फटका मूर्तिकारांना तसेच पर्यायाने ग्राहकांना बसत आहे. इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे वाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे गणोश मूर्तीना लागणा:या मातीचे आणि रंगांचे दर वाढले आहेत. त्यातच मूर्तिकाम हे कष्टाचे आणि वेळकाढू असल्यामुळे कारागीर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मूर्तिकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे असतानाही पारंपरिक, वडिलोपार्जित व्यवसाय टिकवण्यासाठी मूर्तिकार धडपडत आहेत. दरम्यान, बहुतांश गणोश चित्रशाळांमध्ये मूर्तीचे मातीकाम पूर्ण झाले असून रंगकामाला सुरुवात झाली आहे. अर्धा फूट उंचीपासून ते 7 ते 8 फूट उंच मूर्ती चित्रशाळांमध्ये बनत आहेत. साधारण 5क्क् रुपयांपासून ते 1क् ते 15 हजार रुपये किमतीच्या मूर्ती उपलब्ध असल्याची माहिती अष्टविनायक कला केंद्राचे अविनाश पडवळ यांनी दिली. यंदाचे त्यांचे 25 वे वर्ष असून मल्हार रुपातील मूर्तीला चांगलीच मागणी असल्याचे त्यांनी आवजरून सांगितले. बाजारात रेडिमेड गणोशमूर्तीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या या मूर्तीच्या किमतीही चढय़ा दरानेच आहेत. बाजारात मिळणा:या रेडिमेड मूर्तीचा पारंपरिक व्यवसाय असणा:या मूर्तिकारांच्या व्यवसायावर फारसा परिणाम होत नसला तरी मुळातच वेळकाढू आणि कष्टाचे काम असलेल्या व्यवसायात तरुण पिढी येत नसल्यामुळे या व्यवसायाला फटका बसत असल्याचे विक्रेते अजित पडवळ यांनी सांगितले. पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी आम्ही हा व्यवसाय करीत आहोत.
तसेच हौसेला मोल असते असेच या महागाईच्या काळात म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले. यंदा महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत सुमारे 2क् टक्के वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांना शक्य तितक्या वाजवी किमतीत मूर्ती उपलब्ध करण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या बाजारपेठेत अनेक ठिकाणी पेण, हमरापूर भागातील मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
 
कर्जतमध्ये श्रीगणोशमूर्तीचे प्रदर्शन
कर्जत : गेल्या एकोणतीस वर्षापासून सुरु  असलेले गणोशमूर्तीचे प्रदर्शन यंदाही आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यामध्ये  विविधरंगी सुबक व सुंदर गणोशमूर्ती पहावयास मिळत आहेत. कर्जतच्या श्री धापया देवस्थानच्या सभागृहात गणोशमूर्तीच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार रवींद्र बाविस्कर, महेंद्र चंदन, तानाजी बैलमारे, मारु ती बैलमारे,अजित मोकल, दीपक मोधळे, मिलिंद कडू आदी उपस्थित होते. या प्रदर्शनामुळे कर्जतकरांना मनमोहक गणोशमूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन दशकांपासून अखंडपणो हा उपक्र म कर्जतकरांसाठी आयोजित करण्यात येत आहे, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे, असे कर्जतचे नगराध्यक्ष राजेश लाड यांनी सांगितले.