शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

घराला लागलेल्या आगीत सव्वासात लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST

घराला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील सोनटक्के गावात घडली

अनगाव : घराला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील सोनटक्के गावात घडली. भीषण आग आटोक्यात आणण्यात भिवंडी अग्निशामक दलाच्या जवानांना दोन तास लागले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी दुंदाराम शेलार या शेतकर्‍याच्या घरातील किमती वस्तू जळाल्याने सव्वासात लाखांचे नुकसान झाले आहे. यात नुकत्याच लग्न झालेल्या मुलीस आहेर मिळालेल्या दागदागिन्यांसह इतर वस्तूंचा समावेश आहे. दुंदाराम यांचा दुग्ध व्यवसाय आहे. पावसाळा तोंडावर आल्याने त्यांनी गुरांसाठी लागणारा गवत-पेंढा घरात साठवून ठेवला होता. शुक्रवारी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास अचानक त्या पेंढ्यांना आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आटोक्यात येत नाही म्हणून अग्निशामक दलास बोलावण्यात आले. त्यांनी आग आटोक्यात आणेपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे, किमती वस्तूंसह १२ मे रोजी मुलीच्या विवाहात तिला नातेवाइकांनी दिलेल्या वस्तूंमध्ये १२ तोळे सोने वितळले, तर ६५ हजारांची रक्कम यात जळून खाक झाली. या प्रकरणी कवाड तलाठी आर. बी. घागस यांनी पंचनामा करून सात लाख २२ हजार १०० रुपये इतके नुकसान झाल्याचा अहवाल तहसीलदारांना पाठवला आहे. आगीचे कारण समजले नाही. पावसाळा तोंडावर आला असताना ही घटना घडल्याने आणि कर्ज घेऊन मुलीचा विवाह केल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच कवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका दुमाडा यांनी भेट देऊन शेलार कुटुंबीयांचे सांत्वन करून पंचायतीमार्फत मदत करण्याचे आश्वासन दिले. सोबत शिवसेनेचे तालुका सचिव राजेंद्र काबाडी व दीपक दुमाडा होते. (वार्ताहर)