भुसावळातील डीएल हिंदी विद्यालयाचा झाला तलाव

By Admin | Updated: September 26, 2016 14:56 IST2016-09-26T14:56:49+5:302016-09-26T14:56:49+5:30

भुसावळ शहरासह परीसरात रोजच जोरदार पाऊस पडत आहे.

The lake was built in DL Bhalaval DL Vidyalaya | भुसावळातील डीएल हिंदी विद्यालयाचा झाला तलाव

भुसावळातील डीएल हिंदी विद्यालयाचा झाला तलाव

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, दि. २६ -   शहरासह परीसरात रोजच जोरदार पाऊस पडत आहे.रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले. दरम्यान, शहरातील शिवाजीनगरातील डी.एल.हिंदी विद्यालयालाला पावसामुळे तलावाचे स्वरुप आले.विद्यालयातील प्रांगणावर पाणी साचल्याने तलावसदृश्य स्थिती निर्माण झाली. सकाळी विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वर्गात जावे लागले.
मुख्याध्यापक एस.के.जोशी यांनी सांगितले पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर कोणताही परिणाम झाला नाही.मराठी व हिंदी माध्यमाच्या या विद्यालयात ५ वीते १२ वी पर्यंत वर्ग आहेत.नेहमीपेक्षा विद्यार्थी संख्या आज जास्त होती. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनीही आज शाळेला भेट देऊन पाहणी केली,असे त्यांनी सांगितले.

Web Title: The lake was built in DL Bhalaval DL Vidyalaya