शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

केव्हीकेच्या ११२ जागा भरणार !

By admin | Updated: September 14, 2016 00:35 IST

प्रभाव लोकमतचा; शास्त्रज्ञांच्या मुलाखतींना सोमवारपासून वेग

राजरत्न सिरसाटअकोला, दि. १३ : विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांसह इतर ११२ नियमित रिक्त जागा भरण्यात असून यासाठी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मुलाखती घेण्यात येत आहेत. या रिक्त जागांबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला होता हे विशेष.प्रत्येक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी अडचणीविषयक अचूक माहिती व शंका निरसनासाठी राज्यात कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) स्थापना करण्यात आली; परंतु विदर्भ याला अपवाद ठरत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या सात कृषी विज्ञान केंद्रांतील ८0 टक्के शास्त्रज्ञ, कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त असल्याने शेतकर्‍यांना अद्ययावत माहिती पुरविण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे वृत्त लोकमतने ८ मेच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेने लवकरच रिक्त जागा भरण्याचे आदेश निघणार असल्याची माहिती त्यावेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) शास्त्रज्ञ डॉ. राजेंदर जी. रेड्डी यांनी लोकमतला दिली होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सात कृषी विज्ञान केंद्रे आहेत. या प्रत्येक जिल्हय़ातील शेतकर्‍यांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीचे प्रयत्न केले जातात. या केंद्रांतर्गत प्रत्यक्ष शेतात जाणार्‍या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. या सात कृषी विज्ञान केंद्रांतर्गत जवळपास ११२ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी प्रयत्न झाले; पण महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेंतर्गत जागा भरण्याचा प्रस्ताव प्रलंबित होते. त्यामुळे कृषी विद्यापीठाने त्यांच्या आस्थापनेवरील शास्त्रज्ञ, कर्मचार्‍यांना या जागांवर तात्पुरती नेमणूक केल्याने कृषी विद्यापीठाच्या नियमित कामावर त्याचे परिणाम झाले होते. या पृष्ठभूमीवर राज्य शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने दखल घेत या जागा भरण्याचे पाऊल उचलले असून, सोमवारपासून कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन सहायक ांची पदे भरण्यासाठीच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.*प्रत्येक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कृषी अडचणीविषयक अचूक माहिती व शंका निरसनासाठी राज्यात कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) स्थापना करण्यात आली आहे. रिक्त जागा भरण्यात येत असल्याने शेतकर्‍यांच्या शेतीविषयक अडचणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सध्या केव्हीकेची कामे बघत आहेत. त्यांच्यावरील कामाचा भार कमी होईल व कृषी विद्यापीठाचे मनुष्यबळ वाढेल.- डॉ.व्ही.एम. भाले,अधिष्ठाता (कृषी),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.