कीर्ती शिलेदार, श्रीकांत मोघे यांना जीवनगौरव पुरस्कार

By Admin | Updated: February 25, 2015 02:17 IST2015-02-25T02:17:07+5:302015-02-25T02:17:07+5:30

ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत कीर्ती शिलेदार यांना या वर्षीचा संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे

Kirti Shiladar, Shrikant Moghe has been awarded the Life Care Award | कीर्ती शिलेदार, श्रीकांत मोघे यांना जीवनगौरव पुरस्कार

कीर्ती शिलेदार, श्रीकांत मोघे यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई : ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत कीर्ती शिलेदार यांना या वर्षीचा संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात येत्या २ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ््यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते रामदास कामत व अरुण काकडे यांच्या हस्ते हे दोन्ही पुरस्कार
प्रदान करण्यात येणार असून, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद
तावडे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आदी मान्यवर या पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही दिग्गज कलाकारांचा वेध घेणारा ‘मानवंदना’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी खुला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kirti Shiladar, Shrikant Moghe has been awarded the Life Care Award