शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

केईएममधील तरुणाची आत्महत्या नैराश्यातून

By admin | Updated: September 24, 2014 05:28 IST

परळ येथील केईएम रुग्णालयात सोमवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.

मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात सोमवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. या तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. दर्शन बनसोडे (२६) असे त्याचे नाव असून, तो रुग्णालयातील एका रुग्णाचाच नातेवाईक असल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.केईएम रुग्णालयात रविवारी येथील ओपीडी विभाग बंद असल्याने सोमवारी नेहमीप्रमाणे रुग्णालयातील कर्मचा-यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ओपीडी सुरू केली. दरम्यान, येथील मानसोपचार विभागात कर्मचाऱ्यांना एक २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. कर्मचाऱ्यांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी ही माहिती भोईवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात या तरुणाने लाइटच्या वायरने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. हा अपघातदेखील असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती. भोईवाडा पोलिसांनी घटनेची नोंद करीत तपास सुरू केला असता, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी या तरुणाला ओळखले. गेल्या महिनाभरापासून हा तरुण त्याच्या आईसोबत या रुग्णालयात होता. मूळचा नांदेड येथील राहणारा दर्शन त्याच्या आईला घेऊन केईएम रुग्णालयात आला होता. त्याच्या आईला अर्धांगवायू असल्याने तो महिनाभरापासून रुग्णालय परिसरातच राहायचा. नोकरी नसल्याने आर्थिक परिस्थितीदेखील बेताची असल्याने अनेक दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. यातूनच त्याने ही आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)