करवीरनिवासिनी आद्य महालक्ष्मीच्या रुपात

By Admin | Updated: October 13, 2015 18:24 IST2015-10-13T17:59:00+5:302015-10-13T18:24:15+5:30

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी आज (मंगळवार) करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात आद्य महालक्ष्मीची पूजा बांधण्यात आली.

Karveerivani Prini Mahalaxmi | करवीरनिवासिनी आद्य महालक्ष्मीच्या रुपात

करवीरनिवासिनी आद्य महालक्ष्मीच्या रुपात

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. १३ - शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी आज (मंगळवार) करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात आद्य महालक्ष्मीची पूजा बांधण्यात आली. 
आदिशक्तीचा जागर असलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून यानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आज पहिल्या दिवशी मंदिरात आद्य महालक्ष्मीची पूजा बांधण्यात आली. 
मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून आवारात भाविकांच्या गर्दीने आणि सर्वच यंत्रणांच्या लगबगीने उत्सवाचे रंग भरले आहेत. तसेच, मंदिराच्या बाह्ण परिसरात दर्शनरांगा, मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेज उभारण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून येथे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. दर्शनरांगेमध्ये पाच एलसीडी लावण्यात येत असून त्याद्वारे विधींचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. यंदा प्रथमच महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. मंदिरात अंर्त-बाह्य परिसरात एकूण ३५ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातील एक झूम कॅमेरा आहे. तसेच, मंदिराच्या चारही दरवाज्यांवर डोअर मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहेत.

 

Web Title: Karveerivani Prini Mahalaxmi